विश्वविजेता थोरले गामा : विनम्रतेचे मूर्तीमंत उदाहरण
आयुष्यात दोन वेळा जगत्जेते झालेले थोरले गामा पैलवान. एकदा ऐन उमेदीत वयाच्या २४ व्या वर्षी जगत्जेते झाले आणि दुसर्यांदा वयाच्या ४८ व्या वर्षी जगत्जेते झाले. ते हसून म्हणत असत..
''जब पहली बार जगत्जेता हुआ तब मै जोश मे था,
जब दुसरी बार हुआ तो मै होश मे था ''
आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा त्यांचे डोके सुध्दा त्यांना उचलत येत नव्हते तेव्हा ब्रिटीश पत्रकार त्यांची मुलखात घेण्यासाठी त्यांच्या घरी आले.गामाजी अंथरुणात पडून होते.
त्यांना पाहून गामा उठू लागले.घरच्या मंडळीनी त्यांची मान उठवले.गामा म्हणाले ''जरा मेरे गर्दन के नीचे तकिया लगाव''
पत्रकार म्हणाले.
जगत्जेते गामा कसे आहात तुम्ही ? यावर उत्तर म्हणून गामाजी मिश्कीलपणे बोलले....
''अरे यार मै अब मेरी खुद कि गर्दन तक नही उठा सकता,अब मै काहे का जगत्जेता ?
यावर सर्वजन हसले व दुसरा प्रश्न विचारले ,
गामाजी आप अपने बारे मी कुछ बोलेंगे ?
त्यावर गामाजी म्हणाले
''जहासे सुरज उगता है ,और जहा सुरज गुरुर होता है ,उस सारी दुनिया का मै जगत्जेता आपका गामा "
होय सारे जग जिंकले मी पण मी तुमचा गामा आहे.
मंडळी ,किती समर्पण आहे या वाक्यात.
एवढे मोठे पैलवान,पण किती खोलातले बोलून गेले ते.
गामानी शेवटच्या घटकेला सुध्दा नम्रता सोडली नव्हती.
ज्याला ही नम्रता कळते तोच खरा पैलवान असतो.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Team kustimallavidya