शालेय क्रीडा स्पर्धा लवकरच सुरू होणार
अनेक पालकांनी खेळाडूंनी व कोचस यांनी शालेय क्रीडा स्पर्धा कधी सुरू होणार अशा आशयाचे फोन मेसेज मला केले.यावरून मी वरिष्ठ पातळीवर क्रीडा अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे झाले शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देताना अडचणी निर्माण झाल्या.याचबरोबर, गुणवंत खेळाडूंचे नुकसान सुद्धा झाले.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यास कोणतीही अडचण नाही व त्या लवकरात लवकर घ्याव्यात अशी भावना खेळयु,पालक व्यक्त करत होते. मात्र त्यावरच कोणतीच उपाययोजना होत नव्हती.
शालेय क्रीडा स्पर्धा न घेतल्यामुळे 5% खेळाडू आरक्षण अथवा ग्रेस गुणाबाबत समस्या निर्माण झाली आहे.
परंतु यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धा तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर घेण्याचा निर्णय झालेला आहे व लवकरात लवकर शालेय क्रीडा स्पर्धा सुरू होतील अशी माहिती वरिष्ठ क्रीडा मार्गदर्शकांनी दिली.
धन्यवाद
Team kustimallavidya