जगावे दीर्घकाळ निरोगी असे ज्यांना वाटे,त्यांनी न चुकता दररोज मारावे सपाटे - दम,स्टॅमिना,गती,स्फुर्ती वाढवणारा देशी व्यायामप्रकार : माहिती,विडिओ

जगावे दीर्घकाळ निरोगी असे ज्यांना वाटे,त्यांनी न चुकता दररोज मारावे सपाटे - दम,स्टॅमिना,गती,स्फुर्ती वाढवणारा देशी व्यायामप्रकार : माहिती,विडिओ

पारंपारिक व आधुनिक व्यायामप्रकार

🏋🏻‍♂️पै.हेमंत माझिरे🏋🏻‍♂️
अध्यक्ष,पुणे शहर कुस्ती मल्लविद्या महासंघ
स्पष्टीकरण :
भारतीय मल्लविद्येत अनेक व्यायामप्रकार सांगितले आहेत त्यापैकी पूर्वापार चालत आलेला व प्रसिद्ध असा व्यायामप्रकार म्हणजे सपाटे मारणे.सपाटे मारणे हा शब्द "सतत एकसारखे कार्य करणे" अर्थात सपाटा लावणे यापासून आला असावा.सरपाटा म्हणजे सरपटने यार्थी सुद्धा काही ठिकाणी याचा उल्लेख आढळतो.सपाटा मारणे म्हणजे एक जोर व एक बैठक एकावेळी मारणे होय.
कुस्तीसाठी श्वास दम वाढवायला हा व्यायाम अतिशय महत्वाचा होय.शिवाय दंड,खांदे, मांड्या, पिंडऱ्या याचीही बळकटी या व्यायामाने होते.एका अर्थी सुर्यनामस्करानंतर कुस्तीसाठी नखशिखांत अवयवांचा एकाच वेळी व्यायाम या व्यायामाने होते.यासह कुस्तीसाठी जे खुराक जसे तूप, अंडी, मांस आदी पचवायची ताकद या व्यायामप्रकार मध्ये आहे.आजही देशातल्या सर्व तालमीत हा व्यायाम सर्रास केला जातो.

खालील विडिओ द्वारे आपण हा व्यायाम कसा करतात व फायदे तोटे पाहू शकता.
👇👇



धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form