कुस्तीसारख्या खेळासाठी जे पारंपरिक व्यायामप्रकार सांगितले आहेत त्यापैकी जोर मारणे हा अतिप्राचीन व्यायामप्रकार होय.
अगदी महाभारत काळात भीम बकासुर युध्दावेळी बकासुर किती जोर काढायचा याची वर्णने वाचायला मिळतात. तर असा जोर काढणे हा व्यायामप्रकार अनंत काळाची दरी पार करत आजही आपल्यासोबत आहे.या व्यायामाचा उद्देश दंड,खांदे,मजबूत करणे असे आहे.याच जोर मारण्याच्या प्रकारात कालांतराने अनेक पोटप्रकार पडत गेले.आधुनिक जिम मध्ये शरीरसौष्ठव करण्यासाठी किंवा स्वरक्षण शास्त्र जसे कराटे, ज्यूडो या क्रीडाप्रकारात सुद्धा शारीरिक मेहनत करण्यासाठी जोर चे पोटप्रकार जसे डिप्स, पुश अप या इंग्रजी शब्दाने जोराचे पोट प्रकार ओळखले जातात.
इस्त्राईल चे सैनिक मार्शल आर्टस् ज्याला Crow Maga क्राव्ह मागा म्हटले जाते यामध्ये सुद्धा विशेष भर हिंदू पुश अप वर जास्त दिला गेला आहे.
पै.हेमंत माझिरे यांनी सदर विडिओ मध्ये
जोर
अर्धधनुष्य आंदोलक जोर
बोटावर जोर
एका पायावर जोर
एका पायावर एक पाय ठेऊन जोर
चक्रदंड,
तीन बोटावर जोर
इत्यादी जोर चे प्रकार अतिशय सुंदर रित्या सांगितले आहेत.खालील लिंकद्वारे आपण हा व्हिडिओ पाहू शकता.आवडला तर नक्की share करा.