महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील लोकप्रिय पैलवान किरण भगत याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा : विशेष लेख

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील लोकप्रिय पैलवान किरण भगत याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा : विशेष लेख 

2016 पासून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात धुमाकूळ घालणारा पैलवान किरण भगत,2019 पासून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रापासून विविध कारणांमुळे दुरावला होता.
सततच्या दुखापती हे त्यातील प्रमुख कारण.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा मोही गावचा पैलवान वडील नारायण भगत हे सुद्धा एकेकाळचे पट्टीचे पैलवान.
घरगाडा सांभाळण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली.मुंबईत हमाली करुन त्यांनी किरण भगत ला कुस्तीसाठी नेहमी पाठबळ दिले.
किरण चे मोठे बंधू दत्ता भगत हे भारतीय सैन्यदलात नोकरी करतात.
महाराष्ट्राच्या मैदानी कुस्तीत बाहेरून आकडी या डावावर किरण भगत ने अनेक कुस्ती शौकिनांच्या मनात घर केले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेता असणाऱ्या किरण भगत चा चाहता वर्ग महाराष्ट्रात मोठा आहे.
कोरोना महामारीनंतर 2 वर्षे महाराष्ट्रात शड्डू घुमले नाहीत.मात्र,या कुस्ती मोसमाला मोठ्या ताकदीने सुरवात होताना दिसत आहे.
किरण मध्यंतरी दिल्लीत छत्रसाल स्टेडियम मध्ये सराव करत आहे.सध्या तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे येथे सरावास आहे.
कुस्ती करियर मध्ये अनेक चढउतार पाहिलेल्या किरण ने आता नव्या दमाने कुस्तीचा श्रीगणेशा सुरू केला आहे.
किरण महाराष्ट्रात 11 सप्टेंबरला कुंडल येथे माऊली जमदाडे सोबत लढणार आहे.यानंतर त्याच्या महाराष्ट्रभर अनेक कुस्त्या होतील.
2018 किरण भगत विरुद्ध माऊली जमदाडे ही लढत पलूस येथे गाजली.
यामध्ये माऊली विजेता ठरला मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेत किरण ने माऊली वर एकतर्फी विजय मिळवला.त्यानंतर नुकतेच वडकी पुणे येथे हीच कुस्ती गाजली.
त्यानंतर पुन्हा एकदा ही कुस्ती होत आहे.
या कुस्तीच्या निकालावर महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांसाठी कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे सदर मैदान आपण पाहू शकाल.

आज किरण चा जन्मदिवस त्याला कुस्ती-मल्लविद्या महासंघातर्फे जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभचिंतन.

आजच ठीक 10 वाजता कुस्ती-मल्लविद्या फेसबुक पेजद्वारे,वाढदिवसानिमित्त पैलवान किरण भगत आपल्याशी थेट संवाद साधणार आहे.आज सायंकाळी दहा वाजता आपण जरूर कुस्ती-मल्लविद्या फेसबुक पेजवर उपस्थित रहावे.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
kustimallavidya.com

1 Comments

Previous Post Next Post

Contact Form