वयाच्या 48व्या वर्षीही अखंड कुस्ती जगणारे लोहगाव पुणे चे पै.संतोष गरुड (भाऊ)

वयाच्या 48व्या वर्षीही अखंड कुस्ती जगणारे लोहगाव पुणे चे पै.संतोष गरुड (भाऊ)
1994 चे उप महाराष्ट्र केसरी.गोकुळ वस्ताद तालीम पुणे रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचे पठ्ठे पै.संतोष भाऊ गरुड आज वयाच्या 45व्या वर्षीही कुस्ती मेहनत करत आहेत.ऐन भरीच्या काळात त्यांनी कुस्ती क्षेत्रात गरूडभरारी मारली होती.आज 28 वर्षांनंतर सुद्धा तांबड्या मातीशी त्यांचे घट्ट नाते आहे.
भारतीय रेल्वेत ते कार्य करतात.अखिल भारतीय रेल्वे स्पर्धेत सुद्धा त्यांनी अनेक वर्षे मोठी कामगिरी केली होती.आजही ते गोकुळ वस्ताद तालीम पुणे येथे नवोदित मल्लाना आपला अनुभव सढळ हाताने देत असतात व स्वतःही लांघ लंगोट आवळून घाम गाळत असतात.
कुस्ती रक्तात भिनली की तिच्याशिवाय जगणे अश्यक्य होते अश्या काही वेड्या अवलियापैकी संतोष भाऊ एक होय.
अनेक राजे महाराजे संस्थानिक काळात नित्यनियमित कुस्ती मेहनत करत असे. स्वतःच्या राजवाड्यात त्यांनी सायसंगीन तालीम बांधली असे.कुरुंदवाड संस्थानिक राजे सयाजीराव गायकवाड वयाच्या 60 वर्षापर्यंत कुस्ती करत असल्याची नोंद आहे.
सागर भाऊंनी नवोदित मल्लाना आपल्या कर्तृत्वातून फार मोलाचा संदेश दिला आहे.सूर्य उगवतो मावळतो.सृष्टीचक्र थांबत नाही.ज्या खेळामुळे आयुष्यभर आपल्याला ओळखतात तो खेळ आयुष्यभर खेळला पाहिजे.

पै.संतोष भाऊ आपल्या कार्याला शतशः दंडवत.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
Fb.me/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form