सिकंदर शेख चा भारतातील क्रमांक एकचा मल्ल जस्सा पट्टीवर लपेट डावावर विजय : फोटो व विडिओ पहा.

सिकंदर शेख चा भारतातील क्रमांक एकचा मल्ल जस्सा पट्टीवर लपेट डावावर विजय : फोटो व विडिओ पहा.
रुडका खुर्द ता.फिलौर जि.जालंधर पंजाब येथे आज झालेल्या कुस्ती मैदानात भारताचा क्रमांक एकचा मल्ल पैलवान जसा पट्टी विरुद्ध गंगावेस तालीम कोल्हापूर वस्ताद विश्वास हरवले यांचा पट्टा पैलवान सिकंदर शेख अशी तुफानी लढत झाली.
अवघ्या सात मिनिटात सिकंदर शेख यांनी जस्सापट्टीला आसमान दाखवत भारताच्या क्रमांक एक च्या मल्लास चितपट केले.
सहा महिन्यापूर्वी हीच कुस्ती पंजाब येथे झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात कोरोना दुसऱ्या लाटेमुळे लॉक डाऊन सुरू होते. यावेळी कुस्ती बरोबरी सुटली होती.
आज मात्र रुडका हा खुर्द या गावी पैलवान जसा पट्टीविरुद्ध पैलवान सिकंदर शेख ही तुफानी कुस्ती झाली ज्या कुस्तीमध्ये सिकंदर शेख यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत जस्सा पट्टी ला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस सिकंदर शेख ने जस्सा पट्टीवर ताबा मिळवला त्यावेळी आपल्या ब्रह्मास्त्रासारख्या असलेल्या एकचाक डावावर जसाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला मात्र सावध असलेल्या जसाने हा डाव फेटाळून लावला.
सिकंदरच्या ताब्यातून जस्सा सुटायचा प्रयत्न करत असतात सिकंदरने आकडी डाव लावून त्याला पुन्हा खाली धरून आणला व खांद्यावर लपेटून चितपट केला.
सिकंदरच्या विजयानंतर प्रेक्षकांनी उचलून घेऊन अभिवादन केले.महाराष्ट्रातील अनेक सोशल मीडिया ग्रुप वर सिकंदर चे कौतुक होताना दिसून आले.
सिकंदरची कुस्ती आपण खालील विडिओद्वारे पाहू शकता.धन्यवाद
Team kustimallavidya

14 Comments

 1. पै.सिकंदर शेख एक तुफान

  ReplyDelete
 2. सिकंदर ने mat var खेळून international level var महाराष्ट्राचे नाव करावे...

  ReplyDelete
 3. congratulations Pahilwan

  ReplyDelete
 4. जस्सा पट्टी ला अस्मान दाखवणे सोपी गोष्ट नाही, भीम पराक्रम केला आहे ह्या ढाण्या वाघान.....

  ReplyDelete
  Replies
  1. एक वर्ष पासून ची इच्छा पूर्ण केली

   Delete
  2. छान सिकंदर भावा

   Delete
 5. मस्त भावा सोलापूर जिल्ह्याची शान सिकंदर भाऊ

  ReplyDelete
 6. Kharch manl Pailvan la

  ReplyDelete
 7. नाद नाही करायचा वाघ हाय वाघ

  ReplyDelete
 8. पहिलवान 🔥🔥

  ReplyDelete
 9. "सिकंदर"

  ReplyDelete
 10. Best 👍 pailwan pailwan

  ReplyDelete
 11. Super hiro sikandar pahelvan

  ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form