महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास 1 कोटी रु.बक्षीस देणार - डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील
यावर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान सांगली जिल्ह्याला मिळवून विजेत्या मल्लास 1 कोटी रुपयांचे बक्षीस देणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांनी आज सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान "चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन" च्या मध्यामातून सांगली जिल्ह्याला मिळवुन सदर स्पर्धा विना वादविवाद यशस्वी करुन विजेत्या मल्लास 1 कोटी रुपये चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन तर्फे देण्यात येतील.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सदर स्पर्धा आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करु.स्पर्धेची तारीख जाहीर झाल्यानंतर उपविजेत्या मल्लास व इतर वजनी गटातील विजेत्यास किती बक्षीस असेल ते स्पष्ट करण्यात येईल.यापुढे "सांगली पॅटर्न" प्रमाणे तमाम महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येईल अश्याप्रकारे चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन च्या माध्यमातून स्पर्धा आम्ही पार पाडू.असे प्रतिपादन त्यांनी केले.पुढे ते म्हणाले ,चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून विटा येथे 3 एकर जागेत भारतातील सर्वात मोठी "राष्ट्रकुल कुस्ती आखाड्याचे" काम सुरू आहे ज्यामध्ये 500 पैलवानांची राहण्याची व्यवस्था.
अत्याधुनिक मॅट हॉल व माती आखाडा.जिम,स्वामींग टॅंक,लायब्ररी,लेक्चर हॉल,रनिंग स्टेप, गेस्ट हाऊस, कोचेस क्वार्टर,हॉस्पिटल,मॉल,सीबीएस सी स्कुल व कॉलेज,सिंथेटिक रनिंग ट्रॅक अंदाजित रक्कम 22 कोटी रुपये. सदर तालमीत 50 मुले सराव करत असून इतर काम सुरू आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत ते म्हणाले 2003 साली यवतमाळ येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माझी व प्रतिस्पर्धी मल्लाची आज कुस्ती घेऊन निकाल दुसऱ्या दिवशी प्रतिस्पर्धी मल्लाच्या बाजूने देण्यात आला.कुस्तीच्या इतिहासात निकाल दुसऱ्या दिवशी देण्याची घटना यापूर्वी व यानंतर कधीच घडली नाही.त्यानंतर 2009 पुणे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 6 मिनिटाच्या कुस्तीला दीड तास लावला गेला ज्यात मला हरवण्यासाठी बराच वादविवाद केला गेला ज्यामध्ये मी डाव केला तरी गुण प्रतिस्पर्धी मल्लास देण्यात आले.
सदर घटनेचा विडिओ मी आज तुम्हाला देत आहे.यास्पर्धेत मी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीचा गदा सलग तिसऱ्यांदा आणून देण्यासाठी उतरलो होतो.महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात एकमेव मी असा पैलवान होतो ज्याने हा पराक्रम घडवला.मात्र,मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये यासाठी माझ्यावर अन्याय करत मला हरवले गेले.तरीही मी खचून न जाता पुढे 7 वर्षे विविध दुखापती व पराभव पचवत महाराष्ट्र केसरी साठी लढत होतो मात्र मला यश आले नाही.सांगली जिल्ह्यासाठी महाराष्ट्र केसरीचा गदा मी 28 वर्षानंतर मिळवून दिली,दुसऱ्यांदा गदा मिळवण्याचा पराक्रम मी 35 वर्षानंतर घडवला.मी असा एकमेव पहिला पैलवान असेल जो कुस्तीगीर परिषदेच्या स्थापनेपासून 50 वर्षात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढला.महाराष्ट्र केसरीनंतर सुद्धा कुस्ती आहे हे महाराष्ट्राला मी शिकवले.आज अनेक पैलवान दुसऱ्यांदा,तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी खेळत आहे पण याची सुरवात मी माझ्या कर्तृत्वातून केली.
भविष्यात महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानावर अन्याय होणार नाही यासाठी मी "चंद्रहार पाटील युथ फौंडेशन" च्या माध्यमातून कार्य करणार आहे.अन्याय झाल्यानंतर संबंधित कुस्तीगीराना काय वेदना होतात हे माझ्यापेक्षा जास्त कोणी सांगू शकत नाही.माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मी आजवर एकही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पहायला गेलो नाही.कुस्तीवर अन्याय काय असतो व त्याचे परिणाम काय होतात याची मला जाणीव असल्याने असा अन्याय होऊ न देण्याचा मी चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले.
यावेळी हिंदकेसरी संतोष आबा वेताळ,पै.गणेश मानुगडे, पै.विनोद गायकवाड,पै.सचिन किल्लेदार,पै.शंभूराज कदम पै.मदन डाळे, मा.श्री.अमित पाटील सर,मा.श्री.रामदास यादव आदी मान्यवर उपस्थीत होते.
धन्यवाद
Team kustimallavidya
Nice 🙏🙏
ReplyDeleteSunil metkari
ReplyDelete