पै.सागर भाऊ कोळेकर म्हाळुंगे पुणे यांचे दुःखद निधन : तमाम कुस्ती क्षेत्रावर शोककळा

पै.सागर भाऊ कोळेकर म्हाळुंगे पुणे यांचे दुःखद निधन : तमाम कुस्ती क्षेत्रावर शोककळा
पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे-पाडाळे गावचे सुपुत्र पैलवान सागर भाऊ कोळेकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.कुस्ती क्षेत्रावर निस्सीम प्रेम करणारा अवलिया आज हरपला.आपल्या मृदू स्वभावाने महाराष्ट्रभर त्यांनी मित्रपरिवार जमवला होता.त्यांची जाण्याची बातमी हृदयाचा ठाव घेऊन गेली.
सागर भाऊ कोळेकर यांचे स्वतःच्या घरण्यावर,भावावर,गावावर आणि तमाम कुस्ती क्षेत्रावर अलौकिक प्रेम होते.मी ज्यावेळी बालेवाडी स्टेडियम चा उल्लेख करत असे त्यावेळी सागर भाऊ मला फोन करून सांगायचे..भाऊ नुसते बालेवाडी नाही "म्हाळुंगे बालेवाडी" लिहा.बालेवाडी क्रीडानगरी आमच्या गावात आहे.त्यानंतर ज्यावेळी बालेवाडी चा उल्लेख येईल त्यावेळी सागर भाऊंची सातत्याने आठवण यायची.
स्वतःचे बंधू समीर कोळेकर याच्या जडणघडणीत सागर भाऊ यांचा सिंहाचा वाटा.समीर वर अतिशय प्रेम.बंधुप्रेमाचे अनोखे उदाहरण असावे ते.कोणताही लेख किंवा उल्लेख करताना समीर चे नाव घ्या भाऊ असे नेहमी सांगायचे.मोतीबाग तालीम हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांना हे कोळेकर घराणे दैवत मानते.मोतीबाग चा आणि म्हाळुंगे गावाचा जुना संबंध आहे कुस्ती क्षेत्रात.
स्वतःच्या भावावर जितके प्रेम असायचे तितकेच प्रेम सर्व पैलवान मंडळींवर असायचे.मुन्ना झुंजूरके,साईनाथ रानवडे या आपल्या तालुक्यातील मल्लांच्यावर खूप प्रेम करायचे.
सागर भाऊ इतका कुस्तीला वेळ देणारा क्वचित एखादा असतो.म्हाळुंगे गावचे कुस्ती मैदान प्रत्येक वर्षी मला विचारात घेऊन होत असायचे.कोणाची कुस्ती कोणासोबत कशी होईल इथपासून ते प्रचार प्रसार ते live प्रक्षेपण सर्वकाही.मी त्यांच्या घरचाच एक सदस्य होतो असे मानायचे.
चुकीच्या गोष्टी घडल्या तर तोंडावर बोलायचे.माझ्या समोर किती तरी लोकांना त्यांनी चुकीच्या गोष्टींबद्धल बोल सुनावले होते.
असा पुणे जिल्ह्याच्या,महाराष्ट्राच्या कुस्तीवर नितांत प्रेम करणारे माझें मित्र,बंधू,मार्गदर्शन सागर भाऊ आज आमच्यात नाहीत हा विचार मनाला पटत नाही.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना.

शोकाकुल : कुस्ती मल्लविद्या महासंघ

पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya. com

11 Comments

 1. भावपूर्ण श्रद्धांजली पैलवान

  ReplyDelete
 2. भावपूर्ण श्रद्धांजली सागर भाऊ

  Reply

  ReplyDelete
 3. भावपूर्ण श्रद्धांजली सागर भाऊ💐💐💐

  ReplyDelete
 4. भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

  ReplyDelete
 5. भावपूर्ण श्रद्धांजली

  ReplyDelete
 6. भावपूर्ण श्रद्धांजली सागर भाऊ

  ReplyDelete
 7. 💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  ReplyDelete
 8. Bhavpurn shradhanjali

  ReplyDelete
 9. भावपूर्ण श्रद्धांजलि सागर भाऊ,💐💐💐

  ReplyDelete
 10. भावपूर्ण श्रद्धांजली सागर भाऊ 💐💐💐💐

  ReplyDelete
 11. भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😭

  ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form