कुस्ती मल्लविद्या रविवार विशेष भाग 17 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या रविवार विशेष भाग 17
उत्तरे व विजेते 

 1) शिवकालीन इतिहासात अफझलखान भेटीवेळी शिवछत्रपतींचे अंगरक्षक व अफझखानापेक्षा ताकदीने वरचढ असणारा पैलवान मावळा संभाजी कावजी कोंढाळकर होय. 

 2) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम्स) मध्ये भारताला महिला कुस्तीमध्ये पदक मिळवुन देणारी महिला पैलवान गीता फोगट आहे. 

 3) कुस्तीसाठी कोल्हापुरात जसे खासबाग मैदान बांधले आहे तसे पुण्यात कुस्तीसाठी खास बांधलेले मैदान श्रीशिवाजी स्टेडियम आहे. 

 4) जुन्या काळात पुण्यातील कुस्तीला उर्जितावस्था देण्यासाठी व चुरस वाढवण्यासाठी विभागणी केलेले दोन गट शिवरामजीवाले व चंदूभाईवाले.

 5) फ्रीस्टाईल कुस्तीत विजयी होण्यासाठी 10 गुणांची आघाडी आवश्यक असते. 

 6) श्रावण महिन्यात सर्वात जास्त कुस्ती मैदाने घेणारा जिल्हा सांगली आहे. 

 7) फोटोतील वस्ताद जालिंदर मुंढे आबा आहेत. 

 8) जॉर्डन देशात सुरू असलेल्या U15,U20 एशियन चॅम्पियनशिप मध्ये 68kg फ्रीस्टाईल मध्ये सुवर्णपदक मिळवणारा महाराष्ट्राचा पैलवान सुजय तनपुरे आहे.

 9) डबल महाराष्ट्र केसरी पै.लक्ष्मण वडार यांची तालीम काळाइमाम होय. 

 ● आजची उपस्थिती: 209 
● सर्व उत्तरे बरोबर देणारे : 27 

 27 पैकी शफल नंबर द्वारे प्रमुख 5 विजेते ज्यांना मिळणार आहे कुस्ती मल्लविद्या मेटल बटन बँज. 

 1) पै.नितीन जाधव पुसद यवतमाळ 
2) पै.सईद चाऊस आष्टी बीड 
3) पै.अनुष्का शिंदे करमाळा सोलापुर 
4) सचिन बोरचाटे कोल्हापूर
 5) समीर झांबरे बारामती पुणे 

 सर्व सहभागी मल्लांचे हार्दिक अभिनंदन..💐

 धन्यवाद 
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form