कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 28 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 28 | उत्तरे व विजेते
1)पै.मारुती माने हरियाणा कर्नाल येथे हिंदकेसरी कोणत्या साली व कोणाला हरवून झाले?
👉🏻मेहरुद्दीन

अधिक माहिती : 1964 साली हरयाणा कर्नाल येथे 6 फूट 5 इंच उंचीच्या राजस्थानी मेहरुद्दीन पैलवानास बाहेरची टांग डावावर चितपट करुन मारुती माने हिंदकेसरी झाले.

2) चित्रातील परदेशी मल्ल कोण ? 
👉🏻स्टेनीलास झिस्को

अधिक माहिती : जगतजेते थोरले गामा यांनी 3 वेळा यांना पराभूत केले होते.पहिल्यांदा यांनाच हरवून ते जगतजेते झाले होते.झिस्को कुस्ती निवृत्तीनंतर वकील झाले होते.

3) चित्रातील जपानी डाव महाराष्ट्राच्या मैदानात प्रसिद्ध आहे तो ओळखा ?
👉🏻सालतु

अधिक माहिती : हा जपानी मल्लविद्येतील डाव ज्याला सालटो असे म्हणतात.मराठीत सालतू असा अपभ्रंश झाला आहे.मैदानी कुस्तीतील हा लोकप्रिय डाव होय.

●आजची उपस्थिती :185
●आजची बरोबर उत्तरे देणारे :58

58 पैकी शफल नंबर द्वारे आजचे 5 विजेते

1) पै.सौरभ मोहोळ पुणे
2) पै.विशाल रणधीर भुसावळ जळगाव
3) पै.कृष्णा जुमाले सोलापुर
4) पै.भरत काकड नाशिक
5) पै.गोरख खंडागळे अहमदनगरसर्व विजेते व सहभागी यांची यादी खालीलप्रमाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form