कुंडल गावाचे ऐतिहासिक 'महाराष्ट्र कुस्ती मैदान रविवार 11 सप्टेंबर 2022 रोजी होणार : यावर्षी होतील अश्या लढती

कुंडल गावाचे ऐतिहासिक 'महाराष्ट्र कुस्ती मैदान रविवार 11 सप्टेंबर 2022 रोजी होणार
अनंत चतुर्थीनंतर येणारा रविवार म्हणजे तमाम भारतातील कुस्ती शौकिनांच्या वाटा कुंडल गावी वळणार  अशी आख्यायिका आहे.सांगली जिल्हा, पलुस तालुक्यातील कुंडल गावी यंदाचे कुस्ती मैदान रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. मैदानात लहानमोठ्या 300 च्या लढती होणार आहेत.यापैकी  प्रमुख लढती खालीलप्रमाणे...

1)पैलवान सुमित मलिक विरुद्ध पैलवान मिर्झा इराण
2) पैलवान गौरव मच्छिवाडा  ( बाबा भक्तीनाथ आखाडा पंजाब) विरुद्ध पैलवान अजय गुज्जर (सोहना दिल्ली)
3) पैलवान किरण भगत  (आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे) विरुद्ध पैलवान माऊली जमदाडे (गंगावेश तालीम कोल्हापूर)
4) पैलवान पृथ्वीराज पाटील (शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर,भारतीय सेनादल ) विरुद्ध पैलवान मोनू खुराना (छत्रसाल आखाडा कोल्हापूर)
5) पैलवान बालारफीक शेख (हनुमान आखाडा पुणे)  विरुद्ध पैलवान मोनू दहिया (विरेंदर आखाडा दिल्ली) 
6) पैलवान माऊली कोकाटे (हनुमान आखाडा पुणे विरुद्ध पैलवान लवप्रित खन्ना,पंजाब)
7) पैलवान भारत मदने (बारामती जि. पुणे) विरुद्ध पैलवान दीपक काकरान (गुरू हनुमान आखाडा दिल्ली) 
8) पैलवान कार्तिक काटे (दावनगिरी कर्नाटक) विरुद्ध पैलवान वेताळ शेळके (आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे)
इतर सर्व कुस्त्या जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे.फक्त 50 रु.पासून 700 रु.पर्यंत कुस्त्या जोडण्याचे काम मैदानादिवशी सकाळी 9 ते 11 दरम्यान होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कुंडल कुस्ती मैदान चा इतिहास

कुंडलमध्ये श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी श्रीकालीकुंड पार्श्वनाथाच्या नावाने यात्रा भरते.
तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये गणपतीच्या नावाने मोठ्या यात्रेचे आयोजन करणेत येते या मध्ये लाखोंच्या संख्येने कुस्ती शौकीन कुस्त्या पाहण्यसाठी येत असतात.
 या गावामध्ये तीन महादेव देवालयामध्ये महादेवाच्या आवारात १२ वर्षातून एकदा भागीरथी  च्या रूपाने विहिरीस पाणी येते ज्यामध्ये आंघोळ करण्यासाठी सर्व भागातून भाविक सार्वजनिक एकत्र येतात. 
अनंत चतुर्थीनंतर येणाऱ्या रविवारी कुंडल येथे जंगी मल्लयुद्धाचे आयोजन होते. शंभर वर्षापेक्षा जास्त परंपरा असलेल्या या मैदानात सारा महाराष्ट्र तसेच कर्नाटक ,आंध्रप्रदेश ,गोवा,मध्य प्रदेश या भागातून कुस्ती शौकीन येतात. 
मोठमोठे हिंदकेसरी,भारत केसरी ,रुस्तुम ए हिंद , ऑलिम्पिक वीर या मैदानात अगदी न चुकता हजेरी लावतात. 
लाखोंच्यावर बक्षिसांची खैरात पैलवानावर करणारे हे कुंडल गाव. 
कुंडल या गावाचा उल्लेख हिंदुंच्या अनेक पुराणात सापडतो.
देवगिरी महाराष्ट्राच्या  सकलसौभाग्यसंपन्न राजधानीतील यादव राजे यांची कुंडलापूर नामक नगरी म्हणजेच आत्ताची कुंडल नागरी होय.
राजे भीमदेवराय यादव हे वैभव संपन्न कुंडलनगरी चे एकेकाळचे राजे, यांच्या काळात परिसरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या.
कोळे नरसिंहपूर येथील श्रीनरसिंहाची भूगर्भातील गुहेतील मूर्तीचा जीर्णोध्दार साधारण याच कालखंडात झाला होता.
मोगली आक्रमकांच्या टोळधाडीत अनेक ऐतिहासिक शहरे नष्ट झाली मात्र कुंडल नगरी आजही वैभवसंपन्न आहे.
शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यातील कार्यासाठी या पंचक्रोशीतील अनेक तरुण सामील झाले होते.
स्वातंत्र्यकाळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली पंचक्रोशीत बंडाची पताका रोवली ते याच गावाचे क्रांतीअग्रणी स्व.जी.डी.बापू लाड यांनी.
मल्लविद्येचा प्रचंड छंद असणारे जी.डी.बापू यांनी अनेक नामवंत मल्लाना या ऐतिहासिक मैदानात लढवले.
आजही क्रांती उद्योग समूहाची एक आदर्शवत तालीम कुंडल क्रांती साखर कारखान्यावर आहे जिथे आज अनेक नामवंत मल्ल सराव करून कुंडल चे नाव महाराष्ट्रभर गाजवत आहेत.

यंदा कुंडल चे ऐतिहासिक कुस्ती मैदान अनंत चतुर्थी नंतर येणाऱ्या रविवारी दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे याची नोंद घ्यावी.

Video पहा: 





धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
Team kustimallavidya

6 Comments

  1. Nivedak kon ahet sir

    ReplyDelete
  2. खुप सुंदर लेखन ऐतिहासिक माहिती संदर्भ उत्तम

    ReplyDelete
  3. Prakash bankarchi vetal shelke sobat kusti ghala ani sikander chi kusti kiran bhagat sobat ghala mauli chi kartik kate sobat ghala ak no kustya hotil

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form