वारणा , मोरणा , तोरणा, कानसा , कडवी , कासारी खो-यातील (कोकण पट्ट्यातील) कुस्ती सिझनचा पहिला नारळ फुटला
कोकरुड - चिंचोली- माळेवाडी पारंपारीक "वाद" आनंदात
अनेक वर्षाची परंपरा व इतिहास असणारे वाडावडीलांपासून चालत आलेले पंच पाडव देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत आज छोटेखानी कुस्ती मैदान पार पडले . गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पंच पांडवांची वाद याञा झाली नव्हती.परंतु आज कोकरुड चिंचोली माळेवाडी गावातील असंख्य कुस्ती प्रेमींच्या आग्रहाखातर व छोट्यामोठ्या देणगीदारांच्या देणगीतुन छोट्यातल मोठं कुस्ती मैदान यशस्वी पार पडले .
वादाचं कुस्ती मैदान हे सिझनचे पहिले कुस्ती मैदान म्हणून या मैदानास पुरातण काळापासून महत्व प्राप्त झालेले आहे. पुर्वी हे कुस्ती मैदान फार मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य पार पडत होते.परंतु मध्यंतरीच्या काळात त्याला मोडकळ आली . कोकरुड व चिंचोली ला याञेची वैयक्तिक दोन मैदान पार पडु लागली .अलिकडच्या दहा ते बारा वर्षापासुन कोकरुड चिंचोली माळेवाडीच्या लोकांकडुन लाल मातीचा आदर व पैलवानांची कदर म्हणून पुन्हा कुस्ती मैदानाची मुहूर्त मेढ रोवण्यात आली.अलिकडच्या काळात मैदान व्हायला लागल्यापसून मोठ्या प्रमाणात याञा भरु लागली . आजी माजी पैलवान पंच पाडवांचे भाविक भक्त तसेच तिन्ही गावच्या सासुरवाशीन व माहेरवाशीन महिला भगिनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने याञेत सहभागी होऊ लागल्या आणि याञेचा आनंद व महत्व उत्तरोत्तर वाढत गेले .कोकरुड आणि चिंचोली च्या सिमेवर असणारे पंच पाडव देवस्थान आणि त्या देवाची याञा , कुस्ती मैदान व झिम्मा फुगडी उत्सवाने रंगात रंग भरलेला आहे . ह्या याञेच्या निमित्ताने कोकरुड माळेवाडी चिंचोली येथील मोठ्याप्रमात युवा वर्ग माता भगिनी ग्रामस्थ , छोटेमोठे व्यावसाईक यांच्या उपस्थितने हि याञा फुलुन गेली आहे.
दहा ते बारा वर्षापासुन अखंडीत होणारी याञा (वाद) व त्यानिमित्त होणारे कुस्ती मैदान गेल्या दोन वर्षात कोरोना व महापुर या दोन कारणामुळे बंद होते परंतु गेल्या आठ दिवसापुर्वी तिन्ही गावचे आजी माजी मल्ल एकञ येऊन कुस्ती मैदान करण्याचा निर्णय घेतला.छोटेमोठे व्यावसाईक , तिन्ही गावचे ग्रामस्थ व देणगीदारांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला व आज छोट्यातलं मोठ मैदान यशस्वी पार पडले.
हे मैदान कोकणातील सिझनचे पहिले कुस्ती मैदान म्हणून गणले जाते.जास्त पावसामुळे चार महिने पुर्णपणे सिझन बंद असतो.परंतु ह्या मैदानापासुन कोकण पट्ट्यात कुस्तीचा श्री गणेशा होतो.आज झालेले कुस्ती मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी माजी जि.प सदस्य , युवा उद्योजक मा.विकासराव नांगरे पाटील (भैय्या) , मा.दगडु जाधव (महाराष्ट्र पोलीस) , कोकरूड गावचे सुपुञ पोलीस निरीक्षक मा.अर्जुन घोडे पाटील साहेब , कोकरुड पोलिस ठाण्याचे कुंभार साहेब व त्यांचे सहकारी , मा.शंकर बाणकर (मामा) , डाॅ.सुभाष पाटील , पै.वसंत मोहिते , पै.सुनिल दिंडे (माजी उपसरपंच माळेवाडी) , पै.निवास नांगरे (ग्रा.पं.सदस्य कोकरूड),डाॅ.प्रशांत ठोंबरे , पै.धनाजी जाधव (भाऊ) , पै.रोहीत घोडे , मा.विकास सुतार मिस्ञी , पै.तानाजी जाधव(भाऊ) , पै.कपील पाटील , पै.दत्ता नांगरे , पै.राकेश जाधव(फौजी) , मा.सुनिल पाटील , पै. सागर निकम , मा.विक्रम पाटील , मा.भुजंग जंगम(महाराज) , मा.सुरेश जाधव नाना (मा.उपसरपंच चिंचोली) , कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव , पै.राहुल जाधव(मा.उपसरपंच चिंचोली) या मान्यवरांनी विषेश परिश्रम घेऊन मैदान पार पाडले .
ह्या कुस्ती मैदानासाठी पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात मैदान घेण्याचे आश्वासन व काहीही खर्च लागला तर देण्याचे जि प सदस्य विकास भैय्या यांनी जाहीर केले .त्या अनुशंगाने तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी मैदान संपल्यानंतर मिटिंग घेऊन पुढील वर्षी भव्य दिव्य मैदान घेण्याचे एकमताने ठरले आहे .चालु कुस्ती मैदानचे धावते समालोचन सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव यांनी केले .
धन्यवाद 🙏
पंच पांडव याञा उत्सव कमिटी कोकरुड चिंचोली माळेवाडी