आज महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील अभिमानाचा दिवस : आजच्या दिवशी पै.राहुल आवारे ठरला महाराष्ट्रातील पहिला जागतिक पदक विजेता पैलवान
महाराष्ट्राचा प्रतिभावंत पैलवान राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत आजच्याच दिवशी कांस्यपदक मिळवुन देऊन महाराष्ट्रातील पहिला विश्वविजेता पैलवान होण्याचा बहुमान मिळवला होता.कजाकिस्तान मधील नूर सुलतान येथे 2019 साली झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली होती.
2018 चा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान राहुल आवारे कुस्ती प्रकारातील 61 किलो फ्री स्टाईल वजनी गटात जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या वजनी गटात झालेल्या उपांत्य पूर्व फेरीत यजमान कझाकस्तानचा पैलवान आर कलीएव्ह याच्यावर 10-07 अशा फरकाने विजय मिळवला.
पहिल्याच मिनिटाला राहुल 0-2 असा माघार आला होता मात्र त्याने लगेच ही पिछाडी भरून काढत 3-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी तोडीस-तोड खेळ केला.दुसर्या फेरीत राहुलला 6-5 अशी एका गुणाची आघाडी घेता आली.तिसऱ्या फेरीत राहुल ने गुण वसूल करत आपली आघाडी 10-06 अशा फरकावर नेऊन ठेवली अखेरच्या क्षणी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही कझाकिस्तानच्या कलीयेवला एकच गुण मिळवता आला,परिणामतः राहूल अंतिम चार खेळाडूतआपले स्थान निश्चित करू शकला.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य पूर्व फेरीत राहुलने तुर्कमेनिस्तान चा खेळाडू करीम होजाकेव्ह याचा 13-2 ने धुव्वा उडवला.
या स्पर्धेत राहुल कडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती मात्र उपांत्य फेरीत राहुल समोर जॉर्जियाच्या मल्लाकडून निसटता पराभव झाला.
महाराष्ट्रातील मारुती भाऊ माने,श्रीपती खंचनाळे, हरिश्चंद्र बिराजदार,गणपतराव आंदळकर यांच्या काळात जागतिक,ऑलिंपिक स्पर्धेत मराठी झेंडा फडकत असे.त्यानंतर 2019 साली राहुल च्या रुपात महाराष्ट्राला पहिले पदक मिळाले ते सुद्धा जागतिक कुस्ती स्पर्धेत.
धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻
कुस्ती-मल्लविद्या
http://Fb.me/kustimallavidya