कोल्हापुरात साकारली ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव रुपातील श्रीगणेशमूर्ती
डांगे गल्ली तरुण मंडळ, जुना बुधवार पेठ,यांनी कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपातील ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या रूपातील क्रीडा स्तंभावर उभारलेली हुबेहूब सुंदर अशी गणेशाची मूर्ती साकारली आहे,
तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित वंदन लोकराजाला हा देखावा सुद्धा साकारलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत जाधव सर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी माझ्यासमवेत कोल्हापूरचे माजी उप महापौर दिगंबर फराकटे, शामराव जाधव सर, बॉडी बिल्डर नागेश गुरव तसेच डांगे गल्ली तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धन्यवाद..🙏
पैलवान संग्राम कांबळे
महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघ.