कुस्ती खेळताना पैलवानाचा मृत्यू : बेमुदत निकाली कुस्ती, इच्छा आणि वास्तव
दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी हिमाचल प्रदेश मधील गगरेट उन्ना येथील कुस्ती मैदानात कुस्ती खेळत असताना एका पैलवानाचा मृत्यू झाला.बेमुदत निकाली कुस्ती सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
आजकाल बेमुदत निकाली कुस्ती या नावाखाली बरेच यात्रा कमिटी,आयोजक पैलवानाना खूप वेळ लढवत असतात.पैलवान सुद्धा माणूस आहे याचा विसर आयोजकांना पण पडतो आणि प्रेक्षकांना पण.पैलवान कुस्ती खेळून मिळणाऱ्या बक्षिसावर उदरनिर्वाह करत असतात.याचा अर्थ असा नाही की कोणी त्यांना विकत घेतले आहे.कुस्ती समजणारी मंडळी देखील यावेळी गप्प बसतात.मी सर्वांना हात जोडून विनंती करू इच्छितो की मैदानी कुस्तीला काहीतरी वेळेचे बंधन ठेवले पाहिजे.बेमुदत निकाली कुस्ती ऐकायला बरे वाटते पण लढणाऱ्या पैलवानांची अवस्था काय होते याचा विचार करणे गरजेचे आहे.जर पैलवान जीवतोड कुस्ती करत आहेत,डाव प्रतिडाव करत आहेत आणि त्यातून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होत असेल तर अशी कुस्ती सोडवणे किंवा गुणांवर लावून निकालात काढणे हे सुज्ञपणाचे लक्षण असते.
जर दोन्ही पैलवान काहीच अटॅक करत नाहीत नुसते रेटारेटी सुरू असेल तर मात्र नक्कीच दोघांना सूचना देऊन कुस्ती गतिमान करणे हे सुद्धा आवशयक आहे.
मात्र केवळ पैसे मोजलेत आणि आमच्या गावची निकाली कुस्तीची परंपरा आहे म्हणून तास तास पैलवानांना झुंजवणे मला वाटते अतिशय अयोग्य आहे.
पैलवान मनोरंजन करण्याचे मशीन नाहीत ते सुद्धा माणूस आहेत.तसेच आयोजक पै पै गोळा करुन कुस्त्या घेत असतात व आपणही प्राणपणाने झुंजले पाहिजे हे सुद्धा पैलवानांनी लक्षात ठेवले तर अश्या घटना घडणार नाहीत.
मृत्यू झालेल्या मल्लाच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो ही प्रार्थना.
धन्यवाद
Team kustimallavidya