जुन्या काळातील नामवंत मल्ल - पै.शंकर कदम,साप जि.सातारा

जुन्या काळातील नामवंत मल्ल - पै.शंकर कदम,साप जि.सातारा

१९७८  सालचे मुंबईचे सोळावे अधिवेशन भरले होते. 
२० हजार प्रेक्षक ७४  किलो वजनी गटाची कुस्ती चा काय निकाल होतो ते पाहण्यासाठी थांबले होते.
सातारा जिल्ह्यातील साप गावाचे सुपुत्र आणि कोल्हापूरच्या मठ तालमीचे पैलवान शंकर कदम आणि पुण्याच्या मावळ तालुक्यातील अडले गावाचा मल्ल वसंत साबळे यांच्यात हि अंतिम झुंझ होणार होती. 
दोघेही मल्ल झंझावाती कुस्त्या करून अंतिम सामन्यात आले होते. त्यामुळे विजेता कोण होणार याची चर्चा सुरु होती. 
मात्र अटीतटीच्या या सामन्यात गुणावर वसंत साबळे विजयी झाले आणि पैलवान शंकर कदम हे रौप्य पदकांचे मानकरी झाले. 

असे हे शंकर कदम तेव्हापासून सर्व महाराष्ट्र ओळखू लागला. 
मध्यम उंचीचा अतिशय देखणं असा पैलवान प्रारंभिक वेळी कोल्हापूरच्या माठ तालमीत ,तदनंतर शाहूपुरी तालमीत सरावाला होते.
अतिशय मोठमोठ्या पैलवानांशी चार हात करून महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात चांगले नाव कमावले होते. 

सातारा जवळचे साप हे त्यांचे मूळ गाव. 
कुस्ती कारकिर्दीत त्यांची एक कुस्ती अतिशय गाजली होती. 

कोल्हापूर रंकाळा जवळील फुलेवाडी या गावाचे मल्ल लक्षमण रानगे यांच्या गावाचे मैदान होते. 
कुस्ती ठेकेदार पै.शंकर कदम यांना लक्ष्मण बरोबर कुस्ती कर म्हणून बोलू लागले. 
शंकर कदम यांच्या साथीदारांनी लक्ष्मण चे गाव आहे ,शंकर लक्ष्मण ला ऐकणार नाही,तुम्ही  दुसरी जोड बघा . 
ठेकेदार म्हणाले कि नाही हीच कुस्ती ठरावी अशी गावची इच्छा आहे म्हणून हीच कुस्ती ठरुदे. 
शेवटी नाईलाजास्तव हि कुस्ती ठरली. 
मैदानात शंकर कदम आणि लक्ष्मण यांच्यात कुस्ती सुरु झाली. शंकर कदम उलटी ठेप  हा अतिशय जबरदस्त मारत असत. 
लक्ष्मण ला हा डाव मारून त्यांनी लगेच चीतपट केले ,मात्र लक्ष्मण यांनी आणि लोकांना हा निर्णय मान्य नव्हता. 
कुस्ती दिली गेली नाही. 
शेवटी शंकर कदम यांनी ठीक आहे म्हणत हात वर केले ,आणि दुसर्यांदा दोनच मिनिटात लक्षमण रानगे यांना चित केले. 

असे हे शंकर कदम सातारचे झंझावाती मल्ल सध्या  साप या गावी शेती व्यवसाय करत आहेत. 
यांची ओळख तमाम महाराष्ट्राला व्हावी या हेतूने हा लेख लिहत आहे. 
महाराष्ट्रात असे अनेक हिरे आहेत जे त्या त्या काळात अतिशय गाजलेले पैलवान होते मात्र काळाच्या ओघात महाराष्ट्र त्यांना विसरत ,चालला आहे तो काळ ती त्यांची कारकीर्द तमाम महाराष्ट्राला कळावी हाच यामागचा एकमेव उद्देश ठेवून आम्ही कार्य करत आहोत. 

अशीच जुन्या नव्या पैलवानांची माहिती तुम्हाला देत राहीन हे वचन देतो. 
•••••••••••••••••••••••••••••••••••

धन्यवाद 
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या महासंघ
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form