राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे काय ? सविस्तर माहिती
कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल व फेसबुक पेज मध्ये मी पै.गणेश मानुगडे आपले स्वागत करतो.आज आपण माहिती घेऊया की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे नेमके काय.महाराष्ट्रातील आजवर अनेक मल्ल राष्ट्रकुल अर्थात कॉमनवेल्थ स्पर्धेत खेळले आहेत.कुस्ती क्षेत्रात अनेकांना हा प्रश्न पडतो की ही स्पर्धा नेमकी असते कशी.याला कॉमनवेल्थ नाव का दिले गेले.या स्पर्धेचे महत्व किती आणि ही स्पर्धा कोणकोणत्या देशात खेळतात.आज या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओद्वारे आपणास देण्याचा प्रयत्न करणार आहे.
तर मंडळी चला तर मग सुरू करूया आजचा विषय.पण त्याअगोदर आपण चॅनेलवर नवीन असाल तर जरुर subscribe करा आपल्या चॅनलला आणि हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर नक्कीच फेसबुक ला फोल्लो करा,विडिओ like आणि share तर नक्कीच करा.
ईस्ट इंडिया कंपनी अर्थात ब्रिटिशांनी ज्या ज्या देशावर राज्य केले त्या देशात होणारी ही स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल अर्थात कॉमनवेल्थ स्पर्धा होय.तत्कालीन ब्रिटिश अधिपत्याखाली असणाऱ्या देशात परस्पर सौदहर्याची भावना निर्माण व्हावी यासाठी पहिल्यांदा रेव्हरंड ॲस्टले कूपर यांनी 1891 मध्ये मांडली.त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे 1911 मध्ये राजे पाचवे जॉर्ज यांच्या राज्याभिषेक समारंभाच्या निमित्ताने लंडन शहरामध्ये क्रीडास्पर्धा झाल्या. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा त्यात सहभाग होता. ‘बॉक्सिंग, कुस्ती, जलतरण आणि ॲथलेटिक्स हे खेळ त्या वेळी खेळले गेले. त्यानंतर 1930 मध्ये पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धा कॅनडातील हॅमिल्टन शहरात झाल्या. या स्पर्धांच्या आयोजनात ‘मेलविल मार्क्स रॉबिन्सन’ यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्या वेळेस या स्पर्धेचे नाव ‘ब्रिटिश एम्पायर गेम्स’ असे होते. त्या स्पर्धेत स्त्रियांचा सहभाग केवळ जलतरण या खेळापुरताच होता. पुढे 1934 मध्ये त्यांनी ॲथलेटिक्समध्येही सहभाग घेतला.राष्ट्रकुल स्पर्धा ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांमध्ये होणारी एक क्रीडा स्पर्धा आहे. इ. स. १९३० सालापासून दर चार वर्षांनी ही स्पर्धा भरवली जाते. सुरुवातीला ब्रिटिश एम्पायर क्रीडा स्पर्धा, नंतर इ. स. १९५४ पासून ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल स्पर्धा व इ. स. १९७० पासून ब्रिटिश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या नावांनी ही स्पर्धा ओळखली जात असे. १९७८ साली या स्पर्धेला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असं नाव देण्यात आलं.राष्ट्रकुल स्पर्धा ही
कोण भरवतं ही स्पर्धा?
कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ही लंडन येथे मुख्यालय असलेली संस्था राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन करते. राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक खेळांबरोबरच इतर काही विशेष खेळ खेळले जातात. एकूण ५४ देश राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य असले तरीही क्रीडा स्पर्धेत ७१ देश भाग घेतात. युनायटेड किंग्डममधील इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड व वेल्स हे घटक देश स्वत:चे वेगळे संघ इथे पाठवतात.
किती खेळांचा समावेश?
राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण १८ क्रीडा प्रकारांचा (उपप्रकारांसह) समावेश होतो. यात जलक्रीडा, तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, लॉन बोलिंग, नेटबॉल, रग्बी सेव्हन्स, स्क्वॉश, टेबल टेनिस, टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल हे क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत.
काही वैशिष्ट्ये
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ब्रिटिश साम्राज्य पाचही खंडांत पसरलेले होते, त्यामुळे पाचही खंडांतील देश स्पर्धांत असतात. या स्पर्धांकडे ‘इंग्रजी बोलू शकणाऱ्या देशांच्या कुटुंबाचा महोत्सव’ अशा अर्थानेही पाहिले गेले. या ‘स्पर्धा’ असल्या तरी त्यांचे स्वरूप ‘मैत्रीपूर्ण’च राहिले आहे. या बाबतीत त्या ऑलिम्पिकपेक्षा वेगळ्या आहेत. Humanity, Equality, Destiny (come and play) हे राष्ट्रकुल स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे. ब्रिटिश साम्राज्यातील देशांचे स्वरूप लक्षात घेऊनच ही मूल्ये स्वीकारण्यात आली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धांच्या आणि राष्ट्रकुल संघटनेच्या एकूण व्यवहारात ब्रिटिश राजघराण्याचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. 1977 पासून मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दर वर्षी ‘कॉमनवेल्थ डे’ साजरा होतो. त्या वेळी होणारे राणीचे लंडनमधील भाषण अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
राष्ट्रकुल आणि भारत
दुसऱ्या महायुद्धानंतर बदलत्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीत ब्रिटिश साम्राज्यातील अनेक देश स्वतंत्र झाले. या नवस्वतंत्र देशांना ‘राष्ट्रकुलात’ सहभागी व्हायचे की नाही याविषयी संभ्रम होता. भारतही काहीशा अशाच परिस्थितीत होता. डावे पक्ष आणि काही कट्टर ब्रिटिश विरोधक यांचे मत, ‘भारताने राष्ट्रुकलात सहभागी होऊ नये’ असेच होते. नेहरूंसारख्या काहींचे मत असे होते की, आपण राष्ट्रकुलात सहभागी होणे आपल्या हिताचेच ठरणार आहे. त्यावरून 1948-49 मध्ये गरमागरम चर्चा झाल्या. परंतु अखेरीस ब्रिटिशांशी यशस्वी वाटाघाटी 1949 मध्ये झाल्या. त्यानुसार ‘राष्ट्रकुलाचे पूर्वीचे नाव आणि राणीचे स्थान’ याबाबत ब्रिटनने तडजोड केली, तर भारताने राष्ट्रकुलात राहण्याचे मान्य केले. 1956 मध्ये सुवेझ प्रश्नावर आणि 1965 मध्ये भारत-पाक युद्धातील ब्रिटिश भूमिकेवरून भारत राष्ट्रकुलात राहणार की नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला होता. पंतप्रधान शास्त्रीजींचे ‘"There is nothing common and there is no wealth" हे उद्गार प्रसिद्धच आहेत.
भारतातील कुस्तीपट्टू या स्पर्धा कशा खेळू शकतात?
या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड भारतीय कुस्ती महासंघ घेतो.भारतातील मान्यताप्राप्त कुस्ती फेडरेशन आपल्या राज्याची टीम यासाठी पाठवत असते.तसेच सेनादल, रेल्वे यासारख्खा संस्थांची स्वतंत्र टीम सुद्धा असते.राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विजयी झालेले मल्ल देखील थेट या स्पर्धेसाठी पाठवायचा निर्णय भारतीय कुस्ती संघ घेत असतो.
भारताला कुस्ती या खेळात 2018 पर्यंत 43 सुवर्ण,37 रौप्य तर 22 कांस्यपदक मिळाले आहेत.
तर मंडळी राष्ट्रकुल स्पर्धेविषयी माहिती आपणास कशी वाटली आम्हाला कमेंट द्वारे जरूर कळवाआपणास कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे सुद्धा कळवा.विडिओ आवडल्यास like, share जरूर करा.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
kustimallavidya.com