अर्जुनवीर काका पवार विरुद्ध अर्जुनवीर पप्पू यादव 26 वर्षांनी पुन्हा भिडले : 1996 च्या अटलांटा ऑलिंपिकच्या वेळी घडला होता राष्ट्रीय वादाचा मुद्दा

अर्जुनवीर काका पवार विरुद्ध अर्जुनवीर पप्पू यादव 26 वर्षांनी पुन्हा भिडले : 1996 च्या अटलांटा ऑलिंपिकच्या वेळी घडला होता राष्ट्रीय वादाचा मुद्दा

1996 च्या अटलांटा ऑलिंपिक ला 48 किलो ग्रीकोरोमन मध्येबभारताचे प्रतिनिधित्व कोण करणार हा राष्ट्रीय मुद्दा झाला होता.कारण महाराष्ट्राचे पैलवान काकासाहेब पवार यांनी ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर 32 पदके जिंकली होती.त्यावेळी सर्वांच्या मुखात काकासाहेब हे नाव होते.नुकतेच त्यांनी एशियन गेम्स मध्ये कांस्यपदक जिंकले होते.पप्पू यादव यांना विविध राष्ट्रीय स्पर्धेत काका पवार यांनी 9 वेळा हरवले देखील होते.मात्र त्यावेळच्या ऑलिंपिक ला पप्पू यादव यांना पाठवण्यात आले.Wild card एन्ट्री नुसार पप्पू यादव यांनी अटलांटा ऑलिंपिक मध्ये प्रतिनिधीत्व केले होते.
जसे 2016 रिओ ऑलिंपिक वेळी राहुल आवारे विरुद्ध संदीप तोमर या कुस्तीत राहुल ने संदीप ला हरवून देखील ऑलिंपिक ला संदीप तोमर ला पाठवण्यात आले अगदी तसेच काहीसे इथे घडले.
त्याकाळच्या प्रसार माध्यमानी सुद्धा यावर आवाज उठवला मात्र यश आले नाही.
नुकतेच गुजरात ला नॅशनल गेम्स झाल्या ज्यात काका पवार आणि पप्पू यादव हे पुन्हा समोरासमोर आले.एकेकाळी देशाला पदक मिळवून देण्यासाठी दोघेही एकमेकांवर प्राणपणाने तुटून पडायचे तेच यावेळी अतिशय हसतमुखाने जुन्या आठवणींना उजाळा देत होते.
पप्पू यादव गमतीत म्हणाले की मी आजही काकासोबत कुस्ती खेळू शकतो.यावर उपस्थित असणारे विजय बराटे यांनी चेष्टेने दोघांची हातसलामी देखील घडवून आणली.दोघांनीही हसत एकमेकांना मिठी मारली.
कुस्ती क्षेत्रात कोण कोणाचे कायमचे वैरी नसते.अगदी जगतजेते गामा व स्टेनीलास झिबिस्को सुद्धा आयुष्यभर मित्र राहिले.
काका पवार यांनी कुस्ती निवृत्तीनंतर पुण्यात अंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल स्थापन करून आपल्यासारखे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल घडवले.पप्पू यादव यांनीही मध्यप्रदेश मध्ये अनेक पैलवान घडवले.दोघेही अर्जुनवीर आहेत आणि विशेष बाब दोघेही स्टेट फेडरेशन चे सचिव देखील आहेत.वजनात,उंचीत आणि कर्तृत्वात समानता असणारे दोघेही नोकरी सुद्धा रेल्वेची करतात हे विशेष होय.
आपल्या सर्वांच्या माहितीसाठी हा अतिशय प्रेरणादायी किस्सा आज लिहीत आहे.

फोटो : मा.श्री.विजय काका बराटे

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form