महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख यांचा पाथर्डीच्या जरीना शेख यांच्याशी साखरपुडा संपन्न : हार्दिक अभिनंदन


महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख यांचा पाथर्डीच्या जरीना शेख यांच्याशी साखरपुडा संपन्न
महाराष्ट्राचा तुफानी ताकदीचा पैलवान,महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी बालारफिक शेख यांचा साखरपुडा पाथर्डी जि.अहमदनगर येथील जरीना शेख यांच्याशी नुकताच संपन्न झाला.
पै.बालारफीक शेख हे जालना येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेते ठरले होते.बालारफीक शेख यांचे मूळ गाव खडकी ता.करमाळा जि. सोलापूर असून त्यांनी कुस्तीचा प्रारंभिक सराव मा.आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला.त्यानंतर कुस्तीपंढरी कोल्हापुरात न्यू मोतीबाग तालमीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या करकीर्दीस बहर आला.आबांच्या जाण्याने त्याने पुण्यात श्रीहनुमान आखाडा हेच आपले घर बनवले व वस्ताद गणेश दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली आपली कुस्ती पुढे चालू ठेवली.
सदर साखरपुडा सोहळा निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे संपन्न झाला.लग्नासाठी अजून वेळ आहे असे कळवण्यात आले.
पैलवान बालारफिक शेख यांना कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form