पैलवान संतोष भाऊ गरुड वयाच्या 49च्या वर्षीही फिट : भारतीय रेल्वे स्पर्धेत लढण्यास सज्ज

पैलवान संतोष भाऊ गरुड वयाच्या 49च्या वर्षीही फिट : भारतीय रेल्वे स्पर्धेत लढण्यास सज्ज
लोहगाव चे सुपुत्र व गोकुळ वस्ताद तालीम रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामांचे शिष्य,उप महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया रेल्वे चॅम्पियन पैलवान संतोष भाऊ गरुड आज वयाच्या 49व्या वर्षीही शारीरिक तंदुरुस्त आहेत.आगामी ऑल इंडिया भारतीय रेल्वे अंतर्गत स्पर्धेत लढण्यास ते आता सज्ज आहेत.
संतोष भाऊ व्यायामाच्या बाबतीत आजही सजग आहेत.त्यांचे व्यायामाचे विडिओ कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल वर मिलियन views घेत आहेत.
कुस्तीसाठी त्यांचे अखंड घराणे झटत आहे.त्यांचे बंधू सागर गरुड सुद्धा उप महाराष्ट्र केसरी,कित्येकदा राज्य व राष्ट्रीय विजेते आहेत,राष्ट्रीय चॅम्पियन आहेत.चुलत बंधू अक्षय गरुड हा सुद्धा मातीतल्या कुस्तीतील तुफानी पैलवान,कित्येकदा राज्य व राष्ट्रीय विजेता पैलवान आहे.
संतोष भाऊ गरुड सतत 25 वर्षे भारतीय रेल्वे कुस्ती स्पर्धा खेळत आहेत.
सध्या त्यांचा मुलगा सुद्धा कुस्ती या खेळात राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारण्यासाठी सज्ज आहे.अगदी कोरोना काळात स्वतः संतोष भाऊ यांनी आपल्या मुलाला लढत देऊन सरावात खंड पडू दिला नाही.भाऊ अतिशय पितृभक्त आहेत.आपल्या वडीलानी प्रणापेक्षा जास्त जपलेला कुस्ती पेशा पुढे नेणे व आपल्या घराण्यात राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पैलवान घडवणे हे त्यांचे ध्येय असते.
पैलवान संतोष भाऊ गरुड यांची तळमळ कुस्ती क्षेत्रात करियर करणाऱ्या असंख्य मल्लाना स्फूर्ती देणारी आहे.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form