१९६५ च्या "महाराष्ट्र केसरी" कुस्ती स्पर्धेतील ही एक दुर्मिळ आठवण

एक दुर्मिळ आठवण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१९६५ च्या "महाराष्ट्र केसरी" कुस्ती स्पर्धेत पै.गणपत खेडकर आणि पै.दिनानाथ सिंग यांची हातसलामी चा हा दुर्मिळ फोटो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१९६५ च्या मानाच्या "महाराष्ट्र केसरी'" कुस्ती स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते विदर्भातील अमरावती जिल्ह्याला.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की या स्पर्धेवेळी इतिहासात प्रथमच कुस्तीवेळी विद्युत प्रकाशझोताचा वापर करण्यात आला ,याअगोदर सर्व कुस्ती मैदाने,स्पर्धा ह्या दिवसाबरोबर संपल्या जात असत.
त्याचबरोबर यापूर्वी सर्व मैदाने व स्पर्धा माती मध्ये घेतल्या जात होत्या,पण या स्पर्धेवेळी मात्र आंतरराष्ट्रीय कुस्तीसाठी वापरले जाणारे मॅट आणले गेले होते.
महाराष्ट्र केसरी च्या इतिहासात मॅट वर प्रथमताच झालेली स्पर्धा म्हणजे १९६५ ची अमरावती मुक्कामी झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा होय.
सांगली जिल्ह्यातील नवेखेड गावचे व कोल्हापूर च्या गंगावेस तालीमीचे बुरुजबंद शरीरयष्टीचे आणि भाल्यासारखे उंचेपुरे मल्ल म्हणजे पै.गणपतराव खेडकर.
गत वर्षीच १९६३ साली पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी होऊन इतिहास रचलेले खेडकर परत एकदा नशीब आजमवण्यासाठी अमरावती अधिवेशनात उतरले होते.
दुसरा फोटो आहे तो मूळ गाव उत्तर प्रदेश वाराणसी असलेले मात्र कोल्हापुरात स्थायिक झालेले व कोल्हापूरच्या गंगावेस तालीमतच सराव करणारे पै.दीनानाथ सिंह.
योगायोग असा की महाराष्ट्र केसरी ची ही कुस्ती एकाच तालमीच्या मल्लांच्यात आली होती आणि यात नवल नव्हते.
कारण त्याकाळी कोल्हापूर म्हणजे कुस्तीचे लोक विद्यापीठच बनले होते,अनेक कुस्त्या तालमी तालमितील मल्लांच्यात येत असायच्या.
या कुस्तीत महाराष्ट्र केसरी चे प्रबळ दावेदार असलेले खेडकर यांनी दीनानाथ सिंह यांना पराभूत केले होते व सोलापूरच्या तिपन्ना बिराजदार याच्याशी अंतिम कुस्ती करत "डबल महाराष्ट्र केसरी" होण्याचा मान मिळवला होता.

अशी ही अत्यंत जुनी व दुर्मिळ आठवण सहजच सापडली जी कुस्ती-मल्लविद्या वाचकांना द्यावीशी वाटली.
●●●●●●●●
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
www.facebook.com/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form