दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता पै.सुशील कुमार यांच्या कुस्ती कारकिर्दीचा सविस्तर लेख..

दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता पै.सुशील कुमार यांच्य कुस्ती कारकिर्दीचा सविस्तर  लेख..


स्व.खाशाबा जाधव यांच्या नंतर कुस्ती खेळाचा ओलिम्पिक दुष्काळ संपवत या बहाददराने भारताचे नाव जगाच्या नकाशात उंचावले.
सुशील ची वादळी कारकीर्द तमाम "कुस्ती मल्लविद्या" वाचकांसाठी देत आहे..!!
~~~~~~~~~~~~~
बालपण-

जन्म- 26 मे 1983 
जन्मस्थळ - मु.पो.बापरोला जि.नजफ़गड़ दिल्ली.
वजनगट व कुस्ती प्रकार - 66 किलो फ्रीस्टाइल कुस्ती व सध्या 74 किलो साठी खेळतो.
आई-वडील परिचय - वडील पै.दीवाणसिंह व आई सौ.कमलादेवी.
~~~~~~~~~~~~
कुस्ती ची आवड़ व सुरवात -

घरची मल्लविद्येची उज्वल परंपरा असल्याने सुशिल कुमार लहान पणापासून गावच्या आखाड्यात सराव करून पंचक्रोशीतील मैदाने गाजवु लागले.
लहानपणी शालेय कुस्ती स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीत बसलेल्या महाबली सतपाल च्या नजरेत सुशील ची कुस्ती भरली आणि सतपाल यानी सुशिल ला अगदी लहानपणीच् त्याच्या स्वताच्या आखाड्यात सरावासाठी नेले..!
आणि तिथून पुढे सुशील ने यशाची एक एक शिखरे पार केली ती या प्रमाणे...!!

2003- एशियन कुस्ती चैंपियनशिप मध्ये कांस्य पदक
2003- राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक
2005- राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
2007-राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत तीसर्यांदा सुवर्ण प्राप्त करून हैट्रिक केली.
2008- एशियन कुस्ती स्पर्धा कांस्यपदक
2008- बीजिंग ओलिम्पिक मध्ये कांस्यपदक
2009- जर्मन मध्ये ग्रा.प्री.स्पर्धेत सुवर्ण
2010- जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
2010- कॉमन वेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक
2012- लंडन ओलिम्पिक मध्ये रौप्य पदक
2014 - कॉमन वेल्थ गेम्स मध्ये सुवर्ण पदक

आणि आता ऑगस्ट 2016 रिओ द जनेरो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 74 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारातून महाराष्ट्राच्या नरसिंह यादव सोबत ट्रायल घ्यावी हा विषय ऐन ऐरणीवर आला असून..ट्रायल होईल का नाही हे आत्ताच सांगता येत नाही..!

संसारी जीवन
2010 च्या कॉमन वेल्थ गेम्स मध्ये पाकिस्तानी मल्लला चितपट करुन सुवर्णपदक जिंकून आल्यानंतर सुशील चे गुरू आणि सर्वस्व असलेले महाबली सतपाल यानी स्वताच्या मुलीची सावी सिंह आणि सुशील चा साखरपुड़ा केला.
यापूर्वी सुशिल ने व सावी ने एकमेकांना पाहिलेही नव्हते.
फेब्रुवारी 2011 मध्ये सुशील व सावी लग्नच्या बंधनात अडकले..!
सुशील सध्या 2 दोन जुळया मुलांचा पीता आहे..!
सुवर्ण व सुवीर अशी त्याच्या मुलाची नावे
एक वैशिष्ट्य वाटते उत्तर भारतातील मल्लांचे ते असे की विवाहानंतर सुध्दा त्यांचा फॉर्म कित्येक वर्ष टिकतो..!
महाराष्ट्रियन कुस्तीत ब्रम्हचर्याला अनन्यसाधारण महत्व आहे मात्र निष्ठापूर्वक एकपत्नीव्रत हे सुध्दा एक ब्रम्हचर्य होय..!
मुळात कुस्ती साठी मनावर टोकाचा संयम असणे महत्वाचे आहे.तो असेल तर जगातील कोणतेही गोष्ट तुम्हाला ध्येयापासून विचलित करु शकणार नाही..!

Share करा....!

धन्यवाद

पै.गणेश मानुगड़े
कुस्ती मल्लविद्या
www.facebook.com/kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form