दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार वर आरोप निश्चिती : पुढे काय होणार? सविस्तर वृत्त

दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार वर आरोप निश्चिती : पुढे काय होणार? सविस्तर वृत्त


छत्रसाल क्रीडांगण दिल्ली येथे खून प्रकरणात दिल्ली न्यायालयाने बुधवारी दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार आणि अन्य 17 जणांवर आरोप निश्चित केले आहेत.यापुढे त्यांच्या खटल्याची सुनावणी सुरू होत आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी पैलवान सुशील कुमार आणि इतर आरोपींवर IPC च्या वेगवेगळ्या कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत.

यामध्ये खूनकरणे , दंगल घडवणे आणि गुन्हेगारी कट रचणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पैलवान सुशील कुमार आणि इतरांवर ४ मे २०२१ रोजी शहरातील छत्रसाल क्रीडांगणाच्या गाडी पार्किंग जागेमध्ये रराष्ट्रीय विजेता पैलवान सागर धनखर आणि त्याच्या मित्रांवर 'मालमत्तेच्या वादात' हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
'शवविच्छेद' रिपोर्टनुसार पैलवान सागर धनखरचा मृत्यू त्याच्यावर झालेल्या जखमांमुळे झाला आहे. पैलवान सुशील कुमार ला  23 मे रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.2 जून 2021 पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
 गेल्याच महिन्यात दिल्ली पोलिसांनी आपल्या 170 पानांच्या चार्जशिटमध्ये ,पैलवान सुशील कुमारला पैलवान सागर धनकरच्या हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वर्णन केले आहे.
चार्जशीटनुसार, पैलवान सुशील कुमार आणि त्याच्या मित्रांनी रवींद्र उर्फ ​​भिंडा आणि अमित उर्फ ​​खडग यांचे शालीमार बाग आणि सागर, जय भगवान उर्फ ​​सोनू आणि भगत उर्फ ​​भगतू यांचे मॉडेल टाऊनमधून अपहरण केले.त्यांना छत्रसाल क्रीडांगणाच्या आणून बेदम मारहाण करण्यात आली.5 मे 2021 रोजी  ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारादरम्यान सागरचा मृत्यू झाला. 
पैलवान सुशीलला  सूत्रधार म्हणून वर्णन करून,त्याने व  त्याच्या मित्रांसह जय भगवान आणि सागर यांचा बदला घेण्यासाठी हा गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला.कारण देताना त्याने फ्लॅटमध्ये मैत्रिणीचा फोटो काढल्याने जय भगवानने अजयला शिवीगाळ केल्याचे सांगितले.
जय भगवान आणि सोनू पैलवान सुशील कुमारचा फ्लॅट रिकामा करायला तयार होत नव्हते.स्टेडियममध्ये अशी चर्चा व्हायची की सुशील या दोघांना घाबरतो आणि त्यांच्यासमोर उभा राहू शकत नाही.
त्याचे काही विद्यार्थी पैलवान त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचा संशयही सुशीलला होता.जय भगवान उर्फ ​​सोनू याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येत आहे.या कटाबद्दल सांगण्यात आले की, 4 मे रोजी पैलवान सुशील कुमार आणि अजय यांनी सागरची हत्या करून जय भगवानला जखमी करण्याचा कट रचला होता.त्याने काला उर्फ ​​जोगिंदरला फोन केला आणि काला असोधा टोळीतील काही कुख्यात गुन्हेगारांना हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील असोधा गावातून छत्रसाल स्टेडियमपर्यंत शस्त्रांसह बोलावण्यास सांगितले.
दिल्लीतूनही काही गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते.पैलवान सागरची हत्या करून इतर पीडितांना धडा शिकवण्याचा हेतू त्यामागे होता.
पीडितांना 30 ते 40 मिनिटे बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.काहींकडे लाठ्या-काठ्या, हॉकी, बेसबॉल, बॅट आदी शस्त्रेही होती. 
रिपोर्टनुसार, दरम्यान रवींद्र उर्फ ​​भिंडा तिथून फरार झाला. त्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकून आरोपींनी जय भगवान आणि सागर यांना स्टेडियमच्या तळघरात नेले आणि दोघांनाही तिथे सोडून तेथून पळ काढला.

kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form