राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती खेळ सामील नाही झाला तर भारत देशाने राष्ट्रकुल चे सदस्यत्व सोडून टाकावे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती खेळ सामील नाही झाला तर भारत देशाने राष्ट्रकुल चे सदस्यत्व सोडून टाकावे
 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती खेळ सामील नाही झाला तर भारत देशाने राष्ट्रकुल चे सदस्यत्व सोडून टाकावे असे माझे परखड मत आहे.भारताची ओळख जगभरात बलवंताचा देश म्हणून होत आहे.2022 राष्ट्रकुल मध्ये देशाला सर्वाधिक पदके कुस्तीने मिळवून दिली आहेत.आत्ता चढता आलेख पाहता आगामी राष्ट्रकुल मध्ये ही संख्या निश्चित वाढणार आहे.
ऑस्ट्रेलियन लोकांना कुस्तीमध्ये एकही पदक मिळणार नाही हे माहिती आहे म्हणून कुस्ती खेळ वगळला जात आहे.
ज्या ब्रिटिशांनी ज्या 71 देशावर राज्य केले त्यांची क्रीडा स्पर्धा होत असताना त्यांच्या नाकावर टिच्चून कुस्तीत पदके आणणे हे एक प्रकारे त्यांना दाखवून देने आहे की भारत आता कोणत्याही क्षेत्रात शड्डू ठोकायला तयार आहे.

पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya. com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form