मिसाईन मॅन कै. अब्दुल कलाम सो.यांची आज जयंती | कुस्ती खेळावीषयी त्यांची एक आठवण

मिसाईन मॅन कै. अब्दुल कलाम सो.यांची आज जयंती | कुस्ती खेळावीषयी त्यांची एक आठवण

आज भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती कै. अब्दुल कलाम सो. यांची जयंती.त्यांच्याविषयी तमाम भारतीयांच्या मनात आजन्म अभिमान राहील.भारताला अण्वस्त्रधारी देश बनवून जगाच्या नकाशात बलशाली करणारे अब्दुल कलाम यांची आज जयंती.कुस्तीवरील एक त्यांची आठवण इथे सांगत आहे.
2005 साली त्यांच्या हस्ते हिंदकेसरी मारुती माने यांना क्रीडा क्षेत्रातील उच्च असणारा "ध्यानचंद" पुरस्कार देण्यात आला.त्यावेळी मारुती माने यांच्याविषयी सारा देश जाणून होता.
त्याच वेळी पैलवान सुशील कुमार यालाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.
कलाम सो.म्हणाले की महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते.पण,त्यांना कुस्ती हा खेळ आवडत असे.कारण कुस्ती हा असा खेळ आहे जिथे समानता आहे.जिथे जय पराजय हा बहुबलावर ठरतो. जात,पात, पंथ, भेद,वर्ण यावर विजय देण्याची प्रथा कुस्तीत नाही.त्यामुळे कुस्ती हा खेळ वैश्विक समानतेचा संदेश देणारा आहे.

आज डॉ.अब्दुल कलाम सो.यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कुस्तीविषयी काढलेले हे गौरवोद्गार आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहेत.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form