कुंडलचे ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदान 29 जानेवारी रोजी होणार

कुंडलचे ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदान 29 जानेवारी रोजी होणार
कुंडल ता.पलूस जि.सांगली गावचे ऐतिहासिक परंपरा लाभलेले महाराष्ट्र कुस्ती मैदान दरवर्षी अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या रविवारी भरत होते.मात्र,याकाळात पाऊसमान जास्त होते व कित्येकदा मैदान रद्द करायची वेळ येते.2022 च्या कुंडल मैदानादिवशी सुद्धा असेच झाले व लाखो रुपयांची बक्षिसे असणारे कुस्ती मैदान रद्द करायची वेळ आली.मात्र हे मैदान आता 29 जानेवारी 2023 रोजी घेण्याचा निर्णय समस्थ ग्रामस्थ कुंडलकरानी घेतला असून गेली 2 महिने भारतातील काटा जोड शोधून कुस्त्या ठरवण्याचे काम पूर्णत्वास आले आहे.

यावर्षी कुस्ती मैदानात होणाऱ्या कुस्त्या पुढीलप्रमाणे

1️⃣ पैलवान सुमित मलिक विरुद्ध पैलवान बिनिया अमीन
 2️⃣पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान कालू बडवाल

2️⃣पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान अजय कैथल
3️⃣पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान मोनू खुराना
4️⃣पैलवान बालारफिक शेख विरुद्ध पैलवान मोनू दहिया
5️⃣पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान परवीन कोहली
7️⃣ पैलवान कार्तिक काटे विरुद्ध पैलवान पोपट घोडके


यासह इतर अन्य चित्तथरारक कुस्त्या होतील...

100 रु.पासून 1000 रु.इनामाच्या कुस्त्या याच दिवशी सकाळी 9 ते 11 प्रतिनिधी हायस्कुल कुंडल ला जोडण्यात येतील.मैदानात एकही कुस्ती लावली जाणार नाही.
सदर मैदानाचे थेट प्रक्षेपण कोणत्याही चॅनेलवर होणार नाही याची नोंद घ्यावी.

आपले नम्र
समस्थ ग्रामस्थ व कुस्ती कमिटी
कुंडल ता.पलूस जि.सांगली

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form