उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड यांचा हिंदू युवा प्रबोधिनी संस्थेकडून सन्मान !!

उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड यांचा हिंदू युवा प्रबोधिनी संस्थेकडून सन्मान !!
 
 उप महाराष्ट्र केसरी व नुकत्याच झालेल्या 'शिवराय केसरी' मधे विजेतेपदाची गदा पटकवणारे धडाडीचे मल्ल पै. महेंद्र गायकवाड यांचा लौकिकाला साजेलासा सन्मान हिंदू युवा प्रबोधिनी ने केला.
   परदेशात मिळवलेले यश, महाराष्ट्र केसरीतील उपविजेतेपद,   शिवराय केसरीचे विजेतेपद याबद्दल त्यांना 'सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शिवप्रतापाचे चित्र, शाल श्रीफळ फेटा' असे सन्मानित केले. याप्रसंगी,
 हिंदू युवा प्रबोधिनी चे प्रमुख राजेंद्रजी बेंद्रे म्हणाले 'कुस्तीला धर्म नसतो, पण काही व्यक्तींनी महेंद्रला विजेतेपद मिळाल्यानंतर मुद्दाम या यशाला डावलण्यासाठी धर्माची चौकट करुन अपप्रचार केला. खेळात असा धर्म आणुन कोणी मेहनत करणाऱ्या पैलवानांना डावलणार असेल, तर आम्ही महेंद्र व इतर सर्व पहिलवानांच्या मागे ताकदीने उभे राहू' अशी भुमिका मांडली.
   लेखक सौरभ कर्डे यांनी 'पैलवान, तालिम याची परंपरा व शिवकाळातील मल्ल' याचा इतिहास मांडला.
 या प्रसंगी
भारत केसरी पै.विजय गावडे, महा एनजीओ फेडरेशनचे मा.शेखरजी मुंदडा, इतिहास संशोधक श्री अशोक सरपाटील, सा.कार्यकर्ते श्री गणेशजी कदम, आरोग्यदूत श्री.सोमनाथ भोसले, पो.पाटील किरण शेळके, मा.उपसरपंच सुनीत लिंबोरे,ह.भ.प.श्री.विश्वास कळमकर, श्री. दादा दाभाडे हे उपस्थित होते.
  अरविंद वारुळे, लोकेश कोंढरे, विशाल पवार, किरण शिंदे, अविनाश तायडे यांनी आयोजन केले.
  ॲड.अनिरुध्द बनसोड यांनी सुत्रसंचालन केले.

 आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल येथिल सर्व पैलवान व वस्ताद पै.काका पवार व त्यांचे बंधू पै. गोविंद पवार, पै. संदीप रासकर हे यावेळी उपस्थित होते.

बातमी स्रोत : श्री.राजाभाऊ बेंद्रे

- हिंदू युवा प्रबोधिनी 🚩

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form