पै.सागर बिराजदार "बसवरत्न गौरव" पुरस्काराने सन्मानित
रामलिंग मुदगड ता.निलंगा जि.लातूर रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचे चिरंजीव,राष्ट्रीय विजेते,उप महाराष्ट्र केसरी पै.सागर बिराजदार यांना शनिवार दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी समस्त लिंगायत समाज उमरगा जि.लातूर यांच्यातर्फे कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बध्दल "बसवरत्न गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर व म.नि.प्र.श्री.मुरुगेंद्र महास्वामी यांच्या शुभहस्ते व मा.श्री.बसवराज पाटील (माजी राज्यमंत्री) व मा.श्री.बापूरावजी पाटील (अध्यक्ष धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँक) यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.
पै.सागर बिराजदार यांचे या सन्मानासाठी कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दीक अभिनंदन.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
Tags
विजयवार्ता