पै.सुजय तनपुरेची सुवर्ण भरारी| उंचविली महाराष्ट्र राज्याच्या कुस्तीची शान

पै.सुजय तनपुरेची सुवर्ण भरारी
|  उंचविली महाराष्ट्र राज्याच्या कुस्तीची शान🚩🇮🇳💪

विशेष लेख : सुयोग राक्षे
कुस्ती मल्लविद्या सातारा प्रतिनिधी

जॉर्डन देशाची राजधानी असलेल्या अमान शहरात पार पडलेल्या 15 व 20 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील शिरूर गावाच्या सुपुत्राने अंतिम सामन्यामध्ये अश्रम मुस्तफा या इराणच्या मल्लावरती 9-4 या गुण फरकाने विजय मिळवत 15 वर्षाखालील 68 किलो  फ्रीस्टाईल कुस्तीप्रकारातून सुवर्ण पदक आपल्या नावे करत अरब देशात आपल्या भारताचा झेंडा मोठ्या डोलाने फडकत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कुस्तीची खऱ्या अर्थाने शान राखली.

शिऊर या छोट्याश्या गावातून येणाऱ्या सुजयच्या घरचे एक छोटीशी चहाची टपरी चालवीत शेती करतात.

कुस्ती कारकिर्दीची सुरवात

पहिल्यांदा सुजयने आपल्या कुस्तीची सुरुवात वस्ताद विठ्ठल  देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावी केली, पण गावातल्या तालमीत पाहिजे असा सराव न भेटत नसल्याने सुजयने आपली वाटचाल मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाकडे (पुणे) कडे वळविली.

मार्गदर्शन

ज्या तालमीत त्रिवार महाराष्ट्र केसरी विजय भाऊ चौधरी तसेच उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे तसेच हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद रोहित पटेलजी यासारखे महान मल्ल आहेत त्याच्या सहवासात सुजय कसा कच्चा राहणार. सुजयने मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र कुस्तीच्या मैदानामध्ये कमी वयात चांगलाच डंका गाजविला.
कुस्ती कारकीर्द

एका मैदानी कुस्तीत संकेत ठाकूरला मारलेला बॅक थ्रो त्याची क्षमता दर्शवितो.वस्ताद पंकज हरपुडे आणि वस्ताद महेश मोहोळ याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुजयने  हरीयाणा येथे पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेच्या निवड स्पर्धेत देशभरातील मल्लाना आपल्या लाल मातीची रग दाखवत सहा कुस्त्यामध्ये विजय मिळवत अशियायी कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ ठरवली. पण, खरी परीक्षा होती ती जॉर्डनच्या धरतीवरती आणि या स्पर्धेत जपान,तजाकिस्तान तसेच अंतिम सामन्यामध्ये 9-4 या फरकाने इराणी मल्लवरती विजय मिळवत सुर्वण पदकाची कमाई केली. अंतिम सामन्याच्या आधी त्रिवार महाराष्ट्र केसरी विजय भाऊ चौधरी यांनी केलेला कॉल खूप प्रेरणा देणारा होता असे सुजय स्वतः सांगतो.उत्तर प्रदेश मधील गौडा येथे पडलेल्या ग्रँड पिक्स  कुस्ती स्पर्धेत तसेच रोहतक येथे पार पडलेल्या फेडरेशन कुस्ती स्पर्धेत स्पर्धेत सुवर्ण पदके मिळवत आपले,घराण्याचे,तालमीचे व गुरुंचे नाव त्याने उज्वल केले. 

इतक्या कमी वयात यशाची शिखरे चढणारा सुजय येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय कुस्तीत असेच मिळवणार यात शंका नाही.

पैलवान सुजय तनपुरेला पुढील वाटचालीसाठी  खुप साऱ्या शुभेच्छा..💐

धन्यवाद
सुयोग राक्षे
कुस्ती मल्लविद्या प्रसिद्धी विभाग
सातारा जिल्हा प्रतिनिधी

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form