भारतीय कुस्ती अस्थायी समितीकडून "एशियाड" स्पर्धेच्या निवड चाचणीचे मापदंड जाहीर नसल्याने पैलवानांचा उद्रेक होण्याची शक्यता....

भारतीय कुस्ती अस्थायी समितीकडून "एशियाड" स्पर्धेच्या निवड चाचणीचे मापदंड जाहीर नसल्याने पैलवानांचा उद्रेक होण्याची शक्यता....

आज सकाळी इंडियन एक्स्प्रेस च्या स्पोर्ट्स पानावर पत्रकार फिरोज मिर्झा यांचा लेख वाचून मन अतिशय दुःखी झाले.कुस्ती खेळात होत असणारे राजकारण आपण गेली काही महिने अनुभवत आहोतच,पण आता कुठे स्थिरस्थावर होईल असे वाटत असताना ही बातमी मनाला दुःख देणारी ठरली.या इंग्रजी बातमीचा मराठी अनुवाद जसाच्या तसा मी देत आहे.
सोनिपत हरियाणा मधील रायपूर आखाड्यात खूप वेळ मेहनत केल्यानंतर पैलवान सुजित कलकल जो 65 kg फ्रीस्टाईल कुस्तीप्रकारातील राष्ट्रीय विजेता पैलवान आहे,जो आपल्या सहकारी मित्रांसोबत गप्पा मारताना त्याचा श्वास रोखला गेला.एका बातचीत मध्ये त्याचे लक्ष आगामी होणाऱ्या एशियाड स्पर्धेच्या निवड चाचणीत होणाऱ्या राजकारणाकडे वळले.

20 वर्षीय सुजित हा आगामी एशियन गेम्स मध्ये भारतीय संघात स्थान निर्माण करणाऱ्या प्रमुख स्पर्धकांपैकी एक आहे.त्यामुळे त्याच्यासोबत चर्चा करताना त्याच्या मित्रांनी त्याला आगामी निवड चाचणीत तुझ्या वजन गटात बजरंग पुनिया चे स्थान निश्चित तर नाही ना होणार अशी शंका उपस्थित केली.या चर्चेमुळे तो अंतर्मुख होऊन गंभीर झाला.बजरंग काउन्टर पार्ट साठी जागा मिळवत असल्याची चर्चा त्याला अस्वस्थ करू लागली.
अनौपचारीक चर्चेने सुजित घाबरला.विचार करत त्याने मेहनत संपवून घरचा रस्ता धरला.त्याचे वडील दयानंद कलकल याच्याशी त्याने या विषयी भीती व्यक्त केली.तो म्हणाला की काही वजन गटात एशियन गेम्स च्या निवड चाचणीत कोटा मिळवण्यासाठी बजरंग पुनिया प्रयत्नशील आहे.या चर्चेमुळे माझ्या सराव आणि मानसिकतेवर परिणाम होत आहे.सुजित चे वडील दयानंद यांनी ही माहिती दैनिकाना दिली आहे.

सुजितने 2023 मधील 20 वर्षाखालील आशियायी चॅम्पियनशीप मध्ये सहभाग घेतला नाही,बुडापेस्ट मध्ये झालेली रँकिंग सिरीज सुद्धा त्याने खेळली नाही कारण चुकून यादरम्यान जर एशियाड च्या चाचण्या झाल्या तर 65kg मधील स्थान तो गमावुन बसेल.यासह त्याने व्हिसा मिळूनही रशियाला प्रशिक्षण शिबिरला सुद्धा न जाण्याचा निर्णय घेतला. त्याने या चाचणी स्पर्धेसाठी इतका त्याग करूनही आजपर्यंत भारतीय कुस्ती अस्थायी समितीने चाचण्यांचे निकष जाहीर केलेले नाहीत.आता चाचणी स्पर्धेला अवघे 4 दिवस उरले आहेत.पुरुषांच्या ग्रीकोरोमन आणि महिला कुस्ती या चाचण्या 22 जुलै रोजी होणार आहे तर पुरुष फ्रीस्टाईल 23 जुलै म्हणजे दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आल्या आहेत.

12 जुलै 2023 रोजी भारतीय कुस्ती अस्थायी समिती पॅनल अध्यक्ष भुपेंद्रसिंह बाजवा यांनी चाचणीच्या तारखा जाहीर केल्या.परंतु चाचणीचे निकष कसे असतील याबाबत स्पष्टता दिली नाही.मी स्वतः बाजवा यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांनी मला उत्तर देणे टाळले.यानंतर मी सातत्याने मेसेज,कॉल केले मात्र मला त्यांनी याचे उत्तर दिले नाही असे म्हणत दयानंद यांनी हात जोडत म्हणाले की माझ्या मुलाला मी देशासाठी पदक जिंकताना पहायची इच्छा आहे मात्र आता आम्हालाही अनामिक भीती वाटत आहे.

दयानंद यांनी मंगळवारी कायद्याचे निकष पूर्ण करुन या निवड चाचणीत पारदर्शकता येण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी दर्शवली आहे.त्यांनी वकिलांशी बोलून निवड चाचणीत पूर्वीपासून चालत आलेल्या नियम व निकष अस्थायी समितीने तोडू नयेत व काही पैलवानांना विशेष प्राधान्य देऊ नये अशी विनंती केली.जर असे केले तर आम्ही आंदोलन करुन न्याय मागू असेही ते म्हणाले.

सुजितने गतवर्षी अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये, ट्युनिशिया रँकिंग सिरीजमध्ये सुवर्णपदक जिंकून आपली पात्रता सिद्ध केली आहे.23 वर्षाखालील आणि ज्युनियर आशियायी स्पर्धेतही तो अव्वल आला होता. गेल्या वर्षी कॉमनवेल्थ गेम्स निवड चाचणीत त्याने बजरंग पुनियाशी कडवी झुंज दिली होती.मात्र त्याला पराभव स्वीकारावा लागला होता.आगामी एशियाड निवड चाचणीत सुद्धा सुजित पुन्हा चरायला हरकत नाही पण बाऊट न घेता बजरंग ला एशियाड ची सीट मिळणे हे न्यायला धरुन नाही व आम्हाला ते मान्य नाही.

रोहतक मधील छोटुराम स्टेडियममधील 24 महिला पैलवानांनी यापूर्वीच प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांना पत्रे पाठवून आशियायी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचनीसाठी निष्पक्ष व्यक्ती निवडून पारदर्शक चाचणी  व्हावी अशी मागणी केली आहे.

आमच्या तालमीतील 10 हुन अधिक पैलवान भविष्यासाठी तयार आहेत.ते सुद्धा विविध वजनी गटात चाचणीला सामोरे जायला तयारी करत आहेत.मात्र अस्थायी समितीकडून झालेली अनिश्चितता त्यांना गोंधळात टाकत आहे.काही पैलवानांना थेट कोटा देण्याच्या त्यांच्या अन्यायी नियोजनामुळे त्यांच्यात निराशा येत आहे.
या स्पर्धेसाठी आम्ही महिनोमहिने सराव केला आहे.आमची क्षमता सिद्ध करायची संधी आम्हाला हवी आहे एवढीच आमची मागणी आहे.असे त्यांनी एका प्रमुख दैनिकला सांगितले.

अस्थायी समितीने जर निष्पक्ष चाचणी नाही घेतली आणि चाचणीपूर्वी निकष जाहीर केले नाही तर पैलवान आपला राग व्यक्त करायला रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला तर आश्चर्य वाटायला नको.

•••••••••••••••
सदर बातमी ऐकून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राकडे आपण विचार केला तर 57 किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात महाराष्ट्राचा आघाडीचा मल्ल पैलवान राहुल आवारे सुद्धा गेली कित्येक महिने एशियन गेम्स ची तयारी करत आहे. 65 किलो वजनी गटात बजरंग पुण्या तर 57 किलो वजनी गटात रवी दहिया यांना जर विशेष महत्त्व देऊन चाचणी अन्यायकारक होणार असेल तर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या तमाम संघटक क्रीडा पत्रकार व राजकीय मंडळींनी यात लक्ष घालणे गरजेचे वाटते. चाचणीला केवळ चार दिवस उरले असताना महाराष्ट्राच्या किड्या मंत्र्यांनी थेट दिल्लीला या चाचणीचे निकष काय आहेत हे विचारून घेण्यासाठी आपण सुद्धा आता तयारीला लागले पाहिजे असे वाटते.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
Whatsapp 9511802074

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form