महाराष्ट्राच्या पोलीस अधिकारी मल्लांची कॅनडा मध्ये सुवर्णकमाई

महाराष्ट्राच्या पोलीस अधिकारी मल्लांची कॅनडा मध्ये सुवर्णकमाई
कॅनडा विनीपेग जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी
कॅनडा विनीपेग येथे सुरू असणाऱ्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स या मानाच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे 3 dysp पै.राहुल आवारे,पै.नरसिंह यादव,पै.विजय चौधरी यांनी फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये तुल्यबळ कुस्त्या जिंकत सुवर्णपदकांची कमाई केली.
पै.नरसिंह यादव हे मुंबई,पै.राहुल आवारे हे CRPF पुणे, पै.विजय चौधरी हे लाचलूचपत प्रतिबंध विभागात पोलीस उप अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
पै.नरसिंह यादव व पै.राहुल आवारे हे राष्ट्रकुल सुवर्णपदक व जागतिक कांस्यपदक विजेते,अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल आहेत तर विजय चौधरी यांनी सलग तीनदा महाराष्ट्र केसरीचा 'किताब जिंकला आहे.
पोलीस खात्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर या तीनही मल्लांनी सुवर्णपदकांची कमाई करुन केवळ पोलीस खाते नव्हे तर देशाच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले आहेत.
सध्या नरसिंह यादव हा नरसिंह इंटरनॅशनल रेसीलिंग सेंटर,पै.राहुल आवारे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तर पै.विजय चौधरी मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात सराव करतात.
क्लास वन अधिकारी होऊनही आपली कुस्ती या मल्लांनी सुरू ठेवली आणि आंतरराष्ट्रीय पदक जिंकले हा एक नवा आदर्श त्यांनी नोकरी करत कुस्ती करणाऱ्या मल्लांसमोर निर्माण केला आहे.
पै.राहुल आवारे : 57 किलो - सुवर्णपदक
पै.नरसिंह यादव : 74 किलो - सुवर्णपदक
पै.विजय चौधरी : 125 किलो - सुवर्णपदक

तिन्ही मल्लांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form