महाराष्ट्राचे पैलवान Dysp विजय चौधरी करणार वर्ल्ड पोलीस गेम्स 2023 कॅनडा मध्ये देशाचे प्रतिनिधित्व

महाराष्ट्राचे पैलवान Dysp विजय चौधरी करणार वर्ल्ड पोलीस गेम्स 2023 कॅनडा मध्ये देशाचे प्रतिनिधित्व

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात तीन वेळा महाराष्ट्र केसरी बनून इतिहास रचणारे,पोलीस उप अधीक्षक पैविजय चौधरी 28 जुलै ते 6 ऑगस्ट 2023 दरम्यान विन्निपेग,मैनिटोबा कॅनडा  येथे होणाऱ्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

सदर स्पर्धेत 50 पेक्षा जास्त देश सहभागी होणार असून 8500 खेळाडू सहभागी होतील जे 60 वेगवेगळ्या खेळात आपली प्रतिभा दाखवतील.
125 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात त्याने ऑल इंडिया पोलीस गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावले होते आता जागतिक स्तरावर ते पोलीस दल व देशासाठी प्रतिनिधित्व करत आहेत.
पै.विजय चौधरी याला हिंदकेसरी रोहित पटेल यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे.त्यांच्या यशात त्यांचे कोचेस,सहकारी मित्र,कुटुंबीय यांची साथ मोलाची आहे.
पै.विजय चौधरी यांना आगामी जागतिक पोलीस कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक शुभेच्छा..💐

धन्यवाद
Team kustimallavidya 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form