कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 57 | विजेते व उत्तरे

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 57
विजेते व उत्तरे

1) 2014 युथ ऑलिंपिक चीन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला महाराष्ट्राचा पैलवान कोण? 
👉🏻 पै.प्रकाश कोळेकर

अधिक माहिती : पैलवान प्रकाश कोळेकर हा सांगली जिल्ह्यातील आरेवाडी गावचा सुपुत्र ज्याने 2014 च्या युथ ऑलिम्पिक मध्ये भारताची प्रतिनिधित्व केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पैलवान प्रकाश कोळेकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा झेंडा उंच नेला. त्याचा भाऊ बापू कोळेकर हा सुद्धा राज्य राष्ट्र स्तरावरील एक नामवंत पैलवान आहे.सध्या पैलवान प्रकाश कोळेकर हा भारतीय सेनेत मानाची नोकरी करतो.

2) जगतजेते थोरले गामा हे कोणाला आपला खरा प्रतिस्पर्धी मानत होते ?
👉🏻रहीम सुलतानवाला

अधिक माहिती : रहीम सुलतानवाला हे लाहोर नजीक गुजरवाला गावचे एकेकाळचे नामवंत पैलवान. भारत पाकिस्तान फाळणीनंतर बरेच पैलवान लाहोर व गुजरवाला या गावातच स्थायिक झाले.त्यातील रहीम सुलतानवाला हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.थोरले गामा यांच्याशी तीन तीन तास लढणारा हा पहिलवान त्यांच्या कुस्ती करिअरमध्ये एकूण तीन वेळा त्यांनी गामा यांच्याशी टक्कर दिली. त्यातील दोन वेळा कुस्ती बरोबरीत सुटली. तीन तीन तास लढल्यानंतर बरोबरीत कुस्ती सुटली व एकदा गामा यांनी त्याला पराभूत केले.

3) हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे कोणत्या तालमीचे पैलवान होते ?
👉🏻जय भवानी शाहूपुरी तालीम

जय भवानी शाहूपुरी तालीम ही भारतातील सर्वात जास्त हिंदकेसरी, रुस्तुमेहिंद,महान भारत केसरी असे टायटल देणारी तालीम होय. त्यातीलच श्रीपती अण्णा हे एक अग्रगण्य नाव होय.

आजचे सहभागी मल्ल : 106
आज बरोबर उत्तरे देणारे : 02 फक्त 02.

1) महाराष्ट्र केसरी पै.सईद भाऊ चाऊस बीड
2) मा.श्री.संभाजी डिंबळे पुणे

सर्वांची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form