महाराष्ट्राचे 3 पैलवान करणार जागतिक कुस्ती स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व

महाराष्ट्राचे 3 पैलवान करणार जागतिक कुस्ती स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व
पै.शैलेश शेळके 97kg ग्रीकोरोमन
पै.विक्रम कुऱ्हाडे 63kg ग्रीकोरोमन
पै.विनायक पाटील 67 kg ग्रीकोरोमन


दिनांक 16 ते 22 सप्टेंबर 2023 दरम्यान सर्बिया येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचे पठ्ठे पै.शैलेश शेळके व पै.विक्रम कुऱ्हाडे व भारतीय सेनेचा पैलवान विनायक पाटील  देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पै.शैलेश शेळके 97 किलो ग्रीकोरोमन व पै.विक्रम कुऱ्हाडे 63 किलो ग्रीकोरोमन वजन गटात देशाचे प्रतिनिधित्व करतील.तर विनायक 67 kg ग्रीकोरोमन मध्ये खेळणार.

पै.शैलेश शेळके याने पहिल्या कुस्तीत पै.सिद्धार्थ यादव उत्तरप्रदेश याच्यावर 10-3 ने विजय मिळवला.दुसऱ्या कुस्तीत पै.विरेश कुंडू वर 8-0 ने तर तिसऱ्या कुस्तीत पै.सोनू पंजाब वर 8-2 ने विजय मिळवत संघात आपले स्थान पक्के केले.

पै.विक्रम कुऱ्हाडे याने पहिल्या कुस्तीत पै.केवल बेनिवाल वर 7-1 ने विजय मिळवला. दुसऱ्या कुस्तीत उमेश दिल्ली वर 12-8 ने तर तिसऱ्या कुस्तीत 8-2 ने विजय मिळवत संघात आपले स्थान पक्के केले.
पैलवान विनायक पाटील हा कोल्हापूरचा सुपुत्र असून भारतीय सेनेचे प्रतिनिधित्व करतो.

दोन्हीही मल्लांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..💐

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form