कुस्तीक्षेत्रासाठी धक्कादायक बातमी ! जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघाचे सदस्यत्व रद्द

कुस्तीक्षेत्रासाठी धक्कादायक बातमी ! जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघाचे सदस्यत्व रद्द
महाराष्ट्रासह भारतीय कुस्तीला लागलेली उतरती कळा आज वेगळ्याच वळणावर पोहोचली.जागतिक कुस्ती संघटना अर्थात United World wrestling या जगाच्या कुस्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या संघटनेकडून आज भारतीय कुस्ती संघाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
30 मे 2023 रोजी UWW ने भारतीय संघाला अखेरची नोटीस बजावली होती की पुढिल 60 दिवसात निवडणुका घेऊन स्थिर कुस्ती संघाची यादी आम्हाला पाठवावी.मात्र अनेक अडचणीमुळे भारतीय कुस्ती संघ निवडणुका घेऊ शकला नसल्याने जागतिक कुस्ती संघटनेकडून आज भारतीय कुस्ती संघाचे सदस्यत्व रद्द केले.
सदस्यत्व रद्द केल्यानें खालील बाबीवर परिणाम होईल..

●UWW च्या स्पर्धेत भारतीय संघ खेळू शकणार नाही.
●कुस्ती खेळातील विविध उप संघटना,बोर्ड आदीचे पद संबंधित संस्था भूषवू शकणार नाही.
यासह इतर अन्य परिणाम या घटनेमुळे होतील.याबाबत अधिक माहिती UWW शी विचारली असता त्यांनी सांगितले की आम्हाला विविध स्पर्धेचे नियोजन 12 महिने अगोदर करावे लागते.यासाठी संबंधित देशाच्या स्थिर संघटना ज्यांच्यायोगे त्यांच्या देशातील संघ नेतृत्व करतात.एक संघ स्पर्धेत खेळवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असतो तो सुद्धा नियोजनात धरला जातो.UWW ची जनरल बॉडीचे विविध निर्णय,प्रस्ताव व ठराव घेण्यासाठी संबंधित देशाचे सदस्य आमच्या मिटिंग ला येणे बंधनकारक आहे.भारत देश हा कुस्तीसाठी खूप मोठे योगदान देणारा देश आहे मात्र सध्याच्या पदाधिकारी यांच्या गाफीलपणा आणि इतर कारणामुळे हे सदस्यत्व रद्द व्हावे अश्या ठरावावर आज शिक्केमोर्तब करण्यात आले आहे.
भारताने न्यायप्रविष्टय बाबी पूर्ण करून जेव्हा स्थिर कुस्ती संघटना अस्तित्वात आणून आमच्याशी संपर्क केल्यास आम्ही त्यांच्या बाबत सकारात्मक विचार करू मात्र सध्याच्या कॅलेंडर वर्षात त्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्यात येत आहे असे जाहीर करण्यात आले आहे.ज्या खेळाडूंनी UWW च्या अधिकृत स्पर्धेत भाग घेतला आणि पदके जिंकली त्यांच्याही आम्हाला तक्रारी आल्या त्याबाबत यापूर्वी आम्ही भारतीय कुस्ती संघाशी पत्रव्यवहार करुन खुलासा मागितला त्याचेही उत्तर समर्पक आले नाही असे ते म्हणाले.


धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form