कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 56 | उत्तरे व विजेते

कुस्ती मल्लविद्या प्रश्नावली भाग 56
उत्तरे व विजेते

1) एक शीख पैलवान ज्याने महाराष्ट्रात एकेकाळी कुस्तीत वादळ निर्माण केले.महाराष्ट्राचा असणारा हा शीख मल्ल कोण ?
👉🏻पै.दिलीपसिंग गाडीवाले

अधिक माहिती : पै.दिलीप सिंग गाडीवाले हे नांदेड चे सुपुत्र.महाराष्ट्रात 1992 ते 2003-04 पर्यंत त्यांनी मैदानी कुस्तीत धुमाकूळ घातला.कित्येक बलाढ्य मल्लाना चितपट करुन आपले नाव महाराष्ट्रभर केले.
जस्सा पट्टी जसे डोक्याला मुंडासे बांधून खेळतात तसे दिलीप सिंग मैदानात आले की प्रेक्षक बेभान होऊन जातं असत.असे हे शीख असणारे मराठी पैलवान.सध्या भारतीय रेल्वेत कार्यरत आहेत.

2) करमाळा सोलापुर चे डबल उप महाराष्ट्र केसरी अतुल पाटील हे कोणत्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असे?
👉🏻पै.अतुल पाटील

अधिक माहिती : पै.अतुल पाटील हे गोकुळ वस्ताद तालमीचे पैलवान ज्यांनी दोनदा महाराष्ट्र केसरी च्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.मैदानी कुस्तीत सुद्धा पाटील बऱ्याच दिग्गज मल्लांशी लढले.सोलापूरचे सुपुत्र असूनही ते महाराष्ट्र केसरीसाठी उस्मानाबद (धाराशिव) चे प्रतिनिधित्व करत असे.

3) पुण्यातील जुन्या नगरकर तालमीची स्थापना कोणी केली ?
👉🏻संत श्रीजोग महाराज

कुस्तीचे महत्व समजणारे संत श्रीसमर्थ रामदास,जंगली महाराज यांच्यानंतर कोणी असेल तर ते जोग महाराज.18व्या शतकात पुण्यात अनेक ठिकाणी जोग महाराजांनी या तालमी बांधून शक्तीस्थळे निर्माण केली.त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मी रोडवरील नगरकर तालीम.

आजची उपस्थिती : 147
आज 100% बरोबर उत्तरे देणारे : 10

Draw पद्धतीने आजचे 5 विजेते.

1) पै.शुभम राऊत सोलापुर
2) पै.निलेश खोपडे सातारा
3) पै.अक्षय शेंडगे सांगत
4)पै.प्रणित भोसले पंढरपूर
5) पै.बापू कोळेकर सांगली

सर्वांच्या उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे....

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form