पैलवानांच्या विम्यासाठी अमोल बुचडे यांचा पुढाकार

पैलवानांच्या विम्यासाठी अमोल बुचडे यांची मुख्यमंत्र्यांना भेट
राज्यातील पैलवानांच्या विम्यासाठी अमोल बुचडे यांचा पुढाकार

 पुणे शहरापासून गाव - खेड्यापर्यंत कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. यामध्ये प्रामुख्याने फ्री स्टाईल,ग्रिको रोमन, पारंपारिक मातीतील कुस्ती, महिला कुस्ती आणि सुमो कुस्ती अशा वेगवेगळ्या प्रकारात शालेय कुस्ती स्पर्धा, एकविध खेळ संघटना आयोजित  कुस्ती स्पर्धा, निमंत्रित कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी सारखी वरिष्ठ गटातील मानाची स्पर्धा यामध्ये मोठ्या संख्येने कुस्ती खेळाडू सहभागी होतात. कुस्ती हा खेळ शारीरिक झटापटींचा आहे, त्यामुळे यामध्ये शारीरिक क्षमता अव्वल असणे गरजेचे आहे. सर्वसामान्य कुटुंबातील अनेक खेळाडू या खेळातील प्रसिद्धी, अर्थार्जण आणि महाराष्ट्र शासनाच्या थेट नोकरी, भारतीय रेल्वेतील नोकरी आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने खेळाडू हितासाठी लागू केलेले पाच टक्के  आरक्षण या विशेष बाबी समोर ठेवून सहभागी  हो. हा खेळ प्रत्यक्ष शारीरिक झटापटीचा असल्यामुळे खेळाडूंना शारीरिक इजा होण्याचे प्रमाण मोठे आहे. खेळाडूला झालेली इजा ही किरकोळ स्वरूपातील असेल तर ती लवकर दुरुस्त होते, परंतु सांध्यामध्ये झालेली इजा ही गंभीर स्वरूप धारण करते आणि खेळाडूच्या एकूण कारकिर्दीमध्ये खंड पडून कारकीर्द अकाली संपण्याचा धोका निर्माण होतो. गंभीर इजा दुरुस्तीसाठी कराव्या लागणाऱ्या विविध शस्त्रक्रिया- चाचण्या यांचा खर्च आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य घरातील खेळाडूंना परवडत नाही.
 या कारणास्तव त्यांना आपल्या आवडत्या स्वप्नाला अर्धवट स्वरूपात सोडून द्यावे लागते. ही बाब महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रासाठी नवीन नाही, अशा इजा झालेल्या अनेक गुणवान खेळाडूंना आपलं स्वप्न, ते पूर्ण करण्यासाठी केलेले कष्टासह दुर्दैवाने आर्थिक सक्षमता नसल्याने शस्त्रक्रिया अभावी सोडून द्यावा लागते. ही गोष्ट महाराष्ट्रातील अभ्यासू कुस्ती क्षेत्रातील तज्ञ रुस्तम ए हिंद, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांना बऱ्याच दिवसापासून अस्वस्थ करत होती.
याबाबत  खेळातील तज्ञ विमा कंपनीतील तज्ञ यांच्याशी चर्चा करून खेळाडूंसाठी दहीहंडी मंडळांच्या धरतीवर अपघात विमा योजना लागू केली पाहिजे, ही गोष्ट त्यांनी हेरली आणि काल दिनांक 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून संपूर्ण राज्यभरातील खेळाडूंसाठी अपघात विमा कवच बाबत प्राथमिक स्तरावर चर्चा केली.  त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील सर्व खेळाडूंच्या हिताच्या दृष्टीने या मागणीस सकारात्मकता दाखवली आहे.
रुस्तुम ए हिंद, 
महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे आंतरराष्ट्रीय पदक विजेता पै.उत्कर्ष काळे यांनी या वेळी याबाबत निवेदन सादर केले आहे.
 खेळाडूंसाठी अपघात विमा योजना असणे ही काळाची गरज आहे. या पुढाकाराबद्दल राज्यभरातील क्रिडा क्षेत्रातून  त्यांचे स्वागत होत आहे.

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form