शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे वितरण

शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे वितरण
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू,कोचेस,संघटक यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा नगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे वितरीत करण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना आज राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या तीन वर्षांतील पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात सन 2019-20,2020-21,2021,22 असे 3 वर्षाचे पुरस्कार एकत्रित वितरित करण्यात आले.
कुस्ती क्षेत्रात खालील खेळाडू,कोचेस ना सदर पुरस्कार वितरित करण्यात आले..
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक 2019-20

मा.श्री.अमर निंबाळकर
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2019-20

पै.सोनबा गोंगाने,पुणे (कोल्हापूर)
पै.कु.सोनाली तोडकर बीड
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2020-21

पै.सुरज कोकाटे पुणे
पै.कोमल गोळे पुणे
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2021-22

पै.हर्षवर्धन सदगीर पुणे (नाशिक)
पै.कु.स्वाती शिंदे कोल्हापूर

सर्वांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन..💐

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form