फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा रोहतक हरियाणा महाराष्ट्राच्या संघाला 15 वर्षाखालील फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सांघिक विजेतेपद

फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा रोहतक हरियाणा महाराष्ट्राच्या संघाला 15 वर्षाखालील फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सांघिक विजेतेपद

हरियाणा राज्यातील महाऋषी दयानंद विद्यापीठ रोहतक येथे सुरू असलेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 15 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कुस्ती संघाने 220 गुण मिळवून सांघिक विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचा पदक तक्ता व गुणफलक पुढीलप्रमाणे...
नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अस्थायी समितीच्या अध्यक्षतेखाली अत्यंत कमी वेळेत सह्याद्री कुस्ती संकुलात फेडरेशन कप,नॅशनल गेम्स व 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले.कोरोना नंतर खुली व महत्वाच्या 3 राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून पैलवान सहभागी झाले.
आज रोहतक येथे फ्रीस्टाईल कुस्ती मधील 15 वर्षाखालील महाराष्ट्र संघाने सांघिक विजेतेपद आणले त्याबद्धल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.रामदास तडस,सरचिटणीस काकासाहेब पवार,वरीष्ठ उपाध्यक्ष विजय काका बराटे,संदीप आप्पा भोंडवे,योगेशभाऊ दोडके,वैभव दादा लांडगे व सर्व पदाधिकार्यांनी सर्व मल्लांचे त्यांचे कोचेस,कुटुंबीय, पंच यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

धन्यवाद
Team kustimallavidya

1 Comments

Previous Post Next Post

Contact Form