राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेत जाणता राजा कुस्ती केंद्रास 5 पदके - पै संदीप भोंडवे

राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेत जाणता राजा कुस्ती केंद्रास 5 पदके - पै संदीप भोंडवे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      रोहतक , हरीयाना येथे  दिनांक 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या . 15 वर्षाखालील वयोगटामध्ये  महाराष्ट्राच्या कुस्ती संघाकडून प्रतिनिधित्व करताना जाणता राजा कुस्ती केंद्राच्या 5 कुस्तीगीरांनी पदक प्राप्त केले. 
    पदकप्राप्त कुस्तीगीर जाणता राजा कुस्ती केद्रांने सुरु केलेल्या *मिशन ऑलिंपिक* या योजनेमध्ये निवडलेले कुस्तीगीर असुन त्यांचा आहार , निवास व प्रशिक्षणाचा सर्व खर्च जाणता राजा कुस्ती केंद्राच्या वतीने करण्यात येतो. राष्ट्रीय कुस्तीगीर तथा पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै संदीप भोंडवे , एन.आय.एस. कुस्ती कोच पै महीपत कुंडु , पै.महावीर यांच्या मार्गदर्शन खाली सर्व कुस्तीगीर सराव करत आहे. 
    विजयी कुस्तीगीरांचे पीडीसीसी बँकेचे सदस्य श्री प्रदीपदादा कंद , भाजपा नेते रोहीदास उंद्रे , श्री धर्मेंद्र खांडरे यांनी अभिनंदन केले 

पदकप्राप्त कुस्तीगीर खालीलप्रमाणे ...
 फ्रि स्टाईल कुस्ती
1) पै.वक्रतुण्ड फदाले - 38 कीलो , रौप्यपदक 
2) पै.विशाल शिळीमकर - 48 कीलो , रौप्यपदक 
3) पै. ओम काटकर  - 62 कीलो , रौप्यपदक 

ग्रिकोरोमन स्टाईल कुस्ती
 पै. उत्कर्ष ढमाळ - 48 कीलो , ब्रांझपदक 
पै. साईनाथ पारधी - 52 कीलो , ब्रांझपदक

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form