लालबहाद्दूर शास्त्री व्यायामशाळा माटुंगाच्या पै.आशिष यादव चे राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक

लालबहाद्दूर शास्त्री व्यायामशाळा माटुंगाच्या पै.आशिष यादव चे राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक

माटुंगा मुंबई: 
लालबहादूर शास्त्री व्यायाम शाळेतील (माटुंगा मुंबई) पैलवान आषिश यादव याने रोहतक हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या, राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला ग्रिको रोमन प्रकारात 77 किलो मध्ये रौप्य पदक मिळवून दिले.त्याबद्दल लालबहादूर शास्त्री व्यायाम शाळेच्या वतीने पैलवान आषिश यादव याचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंदराव गायकवाड यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
 त्याप्रसंगी मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नामदेव बडरे, राष्ट्रीय विजेते आहसाब अहमद, आंतरराष्ट्रीय पैलवान युवराज वाघ, आंतरराष्ट्रीय पैलवान रंगराव हारणे, महाराष्ट्र चॅम्पियन महादेव कुंभार, महाराष्ट्र चॅम्पियन हनुमंत चव्हाण, महाराष्ट्र चॅम्पियन संतेंदर यादव, महाराष्ट्र चॅम्पियन सुरेश शेळके, महाराष्ट्र चॅम्पियन जालिंदर शेणवी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सर्जेराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पेलवान सुरेश पवार, महाराष्ट्र चॅम्पियन भिमराव लोखंडे, विनोद सणस आणि डब्बल उपमहराष्ट्र केसरी दिलीप पवार, ललित पाली, महाराष्ट्र चॅम्पियन सोपान खोपडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पेलवान प्रकाश जाधव, महाराष्ट्र केसरी पैलवान मुन्नालाल शेख, पैलवान किरणं सकट, पैलवान मनुशेखर, आशियाई सुवर्ण पदक विजेते पैलवान दिपक कांबळे,या सर्व जुन्या जाणत्या पैलवान मंडळी मिळुन पैलवान आषिश यादव यास खुराकासाठी 15000 रुपये देऊन गौरविण्यात आले, आषिश यादव यास पुढिल स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form