भेट "बाजींद"प्रेमींशी...

भेट "बाजींद"प्रेमींशी...
बाजींद 2017 साली लिहून हातावेगळे केले मात्र गेली 5 वर्षे बाजींद ने मला जे काही दिले आहे ती आयुष्यातील बहुमोल कमाई आहे असे मी समजतो.बाजींद वाचून महाराष्ट्रातील वाचक वेडे होतात,बाजींद वाचकांचा एक वर्गच महाराष्ट्रात तयार होत आहे.आई भवानीने बाजींद सारखी कादंबरी माझ्याहातून लिहून घेतली.यात माझे कार्य केवळ निमित्त मात्र आहे.बाजींद चे खरे नायक छत्रपती श्रीशिवराय, गुप्तहेर श्रेष्ठ बहिर्जी नाईक होय.
कोल्हापूरातील "भटकंती" ट्रेकर्स यांच्या समूहाने काल बाजींद वाचून मला आवर्जून भेट दिली.माझे स्नेही विजय खेत्रे यांनी ही भेट घडवून आणली.भटकंती ट्रेकर्स मार्फत अनेक विधायक उपक्रम राबवण्यात येतात.अनेक गडकोट किल्ल्यांची भ्रमंती,शुद्ध व निपक्ष इतिहासाची जपणूक यासह अनेक कार्यक्रम उपक्रम सदर समूह करत आहे हे ऐकून आनंद झाला.यातील सदस्य उद्योजक,शासकीय नोकरदार, व्यावसायिक आहेत.बाजींद एका रात्रीत वाचून काढले हे सांगताना त्यांच्या डोळ्यातील प्रेम दिसत होते.किमान दीड दोन तास ऐतिहासिक गप्पा झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
बाजींद लिखाणनंतर सतत,एकाग्रतेने आणि निष्ठेने कुस्ती मल्लविद्या संस्था उभारणीच्या कार्यात मी स्वतःला हरवून घेतले.हे सुद्धा शिवछत्रपतींचे कार्य आहे असे मी समजतो.मात्र,बाजींद नंतर काय ? हा प्रश्न अनेकांना पडत आहे.पण,लवकरच आपल्या सर्वांच्या प्रश्नाला पूर्णविराम देत आहे.बाजींद उत्तरार्धात आपल्याला अश्याच रहस्यमय कथानकाची सफर आपल्यासाठी घेऊन येत आहे.अगदी काही महिन्यात ती आपणास देतो हा माझा शब्द आहे.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे

2 Comments

Previous Post Next Post

Contact Form