नेत्रदीपक कुस्त्यांनी पलूसकरांची मने जिंकली - पलूस जि.सांगली कुस्ती मैदान फोटो/विडिओ/बातमी

पलूस कुस्ती मैदानात पैलवान माऊली जमदाडे ची पैलवान विक्रांत कोटीवाला वर मात
भारतीय सेनादलाचा पैलवान विक्रांत कोटीवाला विरुद्ध महान महाराष्ट्र केसरी महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे ही कुस्ती तब्बल 50 मिनिटे चालली.अतिशय अटीतटीच्या या कुस्तीने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तुफानी कुस्तीनंतर पैलवान माऊली जमदाडे गुणांवर विजेता ठरला.
राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते वस्ताद राम सारंग यांचा पट्टा पैलवान अक्षय मंगवडे विरुद्ध पैलवान सीना इराणी ही कुस्ती सुद्धा अतिशय तुफानी झाली.45 मिनिटे झालेल्या या कुस्तीत पैलवान अक्षय मंगवडे याने सीना इराणी वर विजय मिळवला.
पैलवान कौतुक डाफळे विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे या कुस्तीमध्ये माऊली कोकाटे विजयी ठरला.
यासह मैदानात अतिशय नेत्रदीपक इतर कुस्त्याही झाल्या.
कुस्ती-मल्लविद्या तर्फे सदर कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
मैदानाचे सूत्रसंचालन जेष्ठ कुस्ती निवेदक पैलवान शंकर पुजारी कोथळीकरईश्वरा पाटील व जोतीराम वाजे सांगलीकर यांनी केले
 पलूस यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री प्रताप तात्या गोंदील हे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मैदानात उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी कुस्त्यांचा आनंद कुस्ती मल्लविद्या थेट प्रक्षेपणाद्वारे घेतला.
जुन्या काळातील कुस्तीचे ठेकेदार वस्ताद बाबाराजे महाडिक यांनी सदर कुस्ती मैदानात सादिक पंजाबी व मारुती माने यांच्या कुस्तीचे वर्णन सांगितले.


धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form