महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्राच्या क्रांती पर्वाला सुरुवात

महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्राच्या क्रांती पर्वाला सुरुवात 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1952 ला महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण भारतालाच ऑलिंपिकमध्ये पहीले पदक कै.पै.खाशाबा जाधव यांनी मिळवुन दिले. त्यावेळी भारतीय कुस्ती संघामध्ये महाराष्ट्राचा दबदबा होता. प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला 3 ते 5 सुवर्णपदके मिळत असे हा दबदबा साधारण 1970 ते 75 पर्यंत जाणवत होता. त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील कुस्तीला घरघर लागली. एकेकाळी महाराष्ट्र कुस्ती संघ जो खो-याने पदक ओढीत होता त्याला अलीकडच्या काळात वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत एक पदक मिळविण्यासाठी झगडताना दीसत आहे.
    मागील 50 वर्षांत काय झाले हे सर्वश्रुत आहे. भाकर खुप वेळ तव्यावर राहीली व तीला पलटी दीली नाही तर ती करपते हा निसर्गाचा नियम आहे. असंच काहीसे चित्र महाराष्ट्र कुस्तीमध्ये मध्यंतरी दिसत होते परंतु आता भाकरीस पलटी मिळाली आहे . *नवा पदाधिकारी नवा जोश , नवा उत्साह व नवनवीन योजना* आता महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रात दिसणार आहेत. त्याचीच एक झलक आता नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये पहावयास मिळाली. 
    वारजे येथील सह्याद्री संकुलामध्ये 6 दिवस निवड चाचणी सुरु होती . सह्याद्री संकुलाचे सर्वेसर्वा श्री विजय बराटे यांनी निवडचाचणीसाठी आलेल्या सर्व कुस्तीगीरांची , पालक , पंच व पदाधिकाऱ्यांच्या जेवन व निवासाची अगदी भुतो ना भविष्यती अशी व्यवस्था केली होती. त्यामुळेच निवड चाचणी करीता आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेह-यावर त्याचे समाधान दिसत होते . निवड चाचणी घेण्यासाठी आलेल्या पंचांना समाधान कारक एकसारखे मानधन देण्यात आले. कोचीन ( केरळ ) येथे होत असलेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी ( चॅम्पियनशिप ) निवडलेल्या संघाला ट्रकसुट , टी शर्ट व रेसलिंग शुज हे कीट पै. संदीपआप्पा भोंडवे , पै योगेश दोडके व श्री संजय शेटे यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले व सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धेसाठी निघालेल्या कुस्तीगीरांच्या दैनंदिन भत्त्यात खासदार रामदास तडस व पै.काकासाहेब पवार यांच्या सुचनेनंतर समाधानकारक वाढ देण्यात आली. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निघालेल्या कुस्तीगीरांना तुटपुंजा दैनंदिन भत्ता मिळाल्यानंतर को-या व्हाऊचर वर सह्या घेतल्या जात होत्या परंतु आता पहिल्यांदाच रक्कम लिहीलेल्या व्हाऊचरवर सह्या घेतल्या जाणार आहे ... 
 महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रामध्ये होत असलेला हा बदल नक्कीच पुढील काळात क्रांती घेऊन येईल व महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देईल यात तिळमात्र शंका नाही.
•••••••••••••••••••••••••••••••

बातमी : पै.संदीप (आप्पा) भोंडवे.

धन्यवाद
Team kustimallavidya
www.kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form