राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक विजेत्या खेळाडुंच्या बक्षीसात वाढ

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक विजेत्या खेळाडुंच्या बक्षीसात वाढ
राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे.सुवर्णपदक विजेत्यांना दहा लाखा ऐवजी 50 लाख रुपये,रौप्यपदक विजेत्यांना साडेसात लाख रुपये ऐवजी 30 लाख तर कास्यपदक विजेत्यांना पाच लाख ऐवजी वीस लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती व घोषणा क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
पंजाब हरियाणाचे सरकार राष्ट्रकुल पदक विजेत्यांना भरघोस बक्षीस देते.महाराष्ट्र त्याबाबत मागे होता पण आता ती कसर भरून निघत आहे.खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे.सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांसाठी साडेबारा लाख रुपये,रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना साडेसात लाख रुपये, तर कास्य पदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शक मार्गदर्शकांना पाच लाख रुपये बक्षीस दिले जाईल.
पंजाब हरियाणा राज्यातील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या विविध भत्यासह सोयी सुविधा राज्यातील खेळाडूंना सुद्धा देण्यात येणार आहेत असेही महाजन म्हणाले.

अशी असेल बक्षिसांची रक्कम 

राज्यातील 14 खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला होता,त्यापैकी सात खेळाडूंनी एकूण आठ पदके जिंकली.हे खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना मिळून साडेतीन कोटी रुपयांचे बक्षीस रक्कम दिले जाईल.

 1) सुनील शेट्टी सुवर्णपदक टेबल टेनिस 50 लाख रुपये.
2) चिराग शेट्टी सुवर्णपदक बॅडमिंटन 50 लाख रुपये.
3) चिराग शेट्टी रोप्य पदक बॅडमिंटन (मिश्र सांघिक)तीस लाख रुपये.
4)  स्मृती मानधना रोप्य पदक क्रिकेट तीस लाख रुपये.
5) जमिनी रॉड्रिक्स क्रिकेट तीस लाख रुपये.
6) राधा यादव रौप्य पदक क्रिकेट तीस लाख रुपये.
7) संकेत सरगर रौप्य पदक वेटलिफ्टिंग 30 लाख रुपये.
8) अविनाश साबळे रोप्य पदक अथलेटिक्स 30 लाख.
Source : Lokmat

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form