महाराष्ट्र कुस्ती लीग पुन्हा सुरु होणार -मा.श्री. शरदचंद्रजी पवार यांचे आश्वासन

महाराष्ट्र कुस्ती लीग पुन्हा सुरु होणार -मा.श्री. शरदचंद्रजी पवार यांचे आश्वासन

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस अर्जुनवीर काकासाहेब पवार,वरिष्ठ उपाध्यक्ष विजय काका बराटे, शासकीय कुस्ती कोच शिवाजी कोळी,उद्योजक मोहसीन भाऊ बागवान, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे,सतीश पांचाळ,जुनिअर जागतिक विजेता पैलवान महेंद्र गायकवाड आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्राची व्यावसायिक कुस्ती स्पर्धा अर्थात महाराष्ट्र कुस्ती लीग जी झी टॉकीज यांनी पुरस्कृत केली होती,सदर स्पर्धा पुन्हा नव्याने सुरू करण्याची विनंती केली.यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब म्हणाले की सदर कुस्ती स्पर्धा पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. 
नुकत्याच झालेल्या जुनियर आशियाई व ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेत पदकांची कमाई केलेला पैलवान महेंद्र गायकवाड याचाही सत्कार आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला व त्याला पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

धन्यवाद
Team kustimallavidya

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form