उद्या 17 सप्टेंबर 2022 रोजी सह्याद्री साखर कारखाना ता.कराड जि. सातारा कुस्ती मैदान 2 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार : उद्याचे मैदान रद्द

उद्या 17 सप्टेंबर 2022 रोजी सह्याद्री साखर कारखाना ता.कराड जि. सातारा कुस्ती मैदान 2 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार : उद्याचे मैदान रद्द
सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंतराव ( शिरवडे स्टेशन) येथे दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी होणारे भारतातील तगड्या मल्लांचे मल्लयुद्ध मैदान महाराष्ट्रात सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे रद्द करण्यात येत आहे.सदर मैदान 2 ऑक्टोबर 2022 रोजी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात येत्या 24 तासात ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे तसेच कुंडल चे महाराष्ट्र कुस्ती मैदान पावसामुळे अवेळी बंद करायची वेळ आल्याचा अनुभव लक्षात घेता कुस्ती शौकिनांची व पैलवान, वस्ताद मंडळींची अवेळी निराशा होऊ नये यासाठी दिनांक 17 सप्टेंबर चे सह्याद्री साखर कारखाना येथे होणारे जंगी कुस्त्यांचे मैदान महात्मा गांधी जयंती दिवशी 2 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे याची सर्व पैलवान, वस्ताद ,पत्रकार व कुस्ती शौकीनानी नोंद घ्यावी.
सदर आवाहन माननीय आमदार बाळासाहेब पाटील,संचालक जसराज बाबा पाटील,कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील व सह्याद्री कारखाना गणेशोत्सव कमिटी अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी केले आहे.

धन्यवाद
🙏🏼🙏🏼
Team kustimallavidya
Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form