सिंथेटीक फायबर ट्रॅक : क्रीडाक्षेत्राची मूलभूत गरज

 सिंथेटीक फायबर ट्रॅक : क्रीडाक्षेत्राची मूलभूत गरज

सिंथेटिक फायबर ट्रॅक ही क्रीडा क्षेत्रासाठी सध्याच्या घडीला मूलभूत गरज होत आहे.कुस्ती या क्षेत्रात हल्ली मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लिगामेंट इंजुरी यासह पायाच्या  सांध्याच्या तत्सम दुखापती होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे धावताना चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या माध्यमावर धावणे जसे की डांबरी रस्ता.सततच्या धावण्यामुळे हळूहळू क्रिया व प्रतिक्रियांमुळे लिगामेंट्स इंजुरीच्या दुखापतीचे प्रमाण वाढू लागते. याचबरोबर मांसपेशीवर येणारा दबाव आणि त्यापासून होणारे दूरगामी दुष्परिणाम पाहता क्रीडा क्षेत्रात केवळ धावण्याच्या व्यायामासाठी हे फायबर ट्रॅक बनवण्यात आले आहेत.

सदर धावपट्टी भारतात एकेकाळी केवळ नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये दिसून येत होते जिथे राष्ट्रीय सराव शिबिरे होत असायची.काही काळानंतर हळूहळू याचा प्रचार होऊन आता पुण्यात बालेवाडी स्टेडियम व इतर असणाऱ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये होत आहेत ही चांगली बाब आहे.


नुकतेच आमचे बंधू,मित्र,मार्गदर्शक सोमेश्वर काळजे यांच्या चरोली गावी जाण्याचा योग आला.गावात नुकतेच अतिशय भव्यदिव्य आणि सर सोयीसुविधा असणारे कुस्ती संकुल पाहिले. श्रीवाघेश्वर महाराज कुस्ती संकुल या नावाने पंचक्रोशीतील खेळाडूंसाठी हे एक नवे दालन निर्माण झाले आहे.या ठिकाणी सदर फायबर ट्रॅक पाहिला आणि आवर्जून आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवला.सर्वांनी नक्की पहा.

👇🏻👇🏻


धन्यवाद

पै.गणेश मानुगडे

Kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form