डोके फुटले,रक्तबंबाळ झाला तरी बजरंग पुनिया लढला : जागतिक कुस्ती स्पर्धेत 4 पदके मिळवणारा एकमेव मल्ल बनण्याचा विक्रम

डोके फुटले,रक्तबंबाळ झाला तरी बजरंग पुनिया लढला : जागतिक कुस्ती स्पर्धेत 4 पदके मिळवणारा एकमेव मल्ल बनण्याचा विक्रम
बेलग्रेड मध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा पैलवान बजरंग पुनिया याने कांस्यपदक जिंकून एक नवा इतिहास रचला.बजरंग पुनिया भारताचा एकमेव पैलवान आहे ज्याने जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकली आहेत.यापूर्वी त्याने 2013 मध्ये कांस्यपदक,2018 मध्ये रौप्यपदक व 2019 मध्ये कांस्यपदक जिंकलेआहे.यावर्षीच्या बेलग्रेड जागतिक कुस्ती स्पर्धेत 65 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात त्याने पुएर्टो रिको च्या सेबस्टियन रिवेरा ला 11-9 ने पराभूत केले.
याच स्पर्धेत भारताची महिला कुस्तीगीर विनेश फोगट हिने पदक जिंकले आहे.बजरंग पुनिया ने टोकियो ऑलिंपिक मध्ये भारताला कांस्यपदक तर 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले आहे.या स्पर्धेत पदक जिंकणारा तो दुसरा पैलवान आहे.

जागतिक कुस्ती स्पर्धेच्या प्रारंभीच्या राउंड मध्ये बजरंग ची पीछेहाट झाली मात्र त्याला रिपेचेज मुळे कांस्यपदक जिंकण्याची संधी निर्माण झाली. रिपेजेच मध्ये त्याने  आर्मेनिया च्या पैलवान वेजगेन तेवान्यान ला तुफानी लढतीनंतर हरवला.
सुरवातीच्या कुस्तीवेळी बजरंग पुनिया चे डोके फुटले होते.मात्र तरीही त्याने स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला.जखमी असल्याने त्यांच्या एकंदरीत खेळीवर परिणाम झाल्याचे दिसत होते.कांस्यपदक लढतीत सुद्धा तो 6-0 ने पिछाडीस होता मात्र त्याने सेकंद हाफ मध्ये 11-9 ने आघाडी मिळवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
kustimallavidya.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form